गावकऱ्यांना आपलसं केल्याने गावकऱ्यांनी केलयं तहसिलदारांचं कौतुक
गावकऱ्यांना आपलसं केल्याने गावकऱ्यांनी केलयं तहसिलदारांचं कौतुक
मंगी (बु) येथे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांचा ग्रामस्थांनी केला नागरी सत्कार
जेसीआय राजुरा रॉयल्स कडून ग्रामस्थांना सॅनिटायझर व मास्क वितरण तथा शिक्षक परशुराम तोडासाम, प्रविण बुच्चे व तृप्ती निंभोरकर यांचा सत्कार. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी पास गुणवंत विद्याथ्यांची सत्कार करण्यात आला
राजुरा : (प्रतिनिधी)
राजुरा तालुक्यातील 20 किमी अंतरावर असलेल्या मंगी (बु) येथील ग्रामवासीयांनी राजुराचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी आणि राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांचा शाल व श्रीफळ व भेट वस्तु देवून नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध योजना गावापर्यत पोहचविण्यात तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांनी मोलाचे सहकार्य केले. फेरफार करणे, जातीचे दाखले, शेतीविषक महसुली कामे गावस्तरावर शिबीरे घेवून सुविधा उपलब्ध करुन दिले. यागावासाठी सदैव तत्पर असणारे व गावावर प्रेम करणारे असे अधिकारी असलेले तहसिलदार डॉ. रविंद्र होळी आणि राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांचा नागरी सत्कार सोहळा ग्रामस्था आयोजित केला. त्याच कार्यक्रमात जेसीआय राजुरा रॉयल्स यांचेकडून ग्रामस्थाना सॅनिटायझर व मास्कचे वितरण आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यांप्रसंगी गावातील 10 वी व 12 वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शिल्ड देवून सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत हे होते. कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती राजुराचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मंगी (बु) गावचे सरपंच रसिकाताई पेंदोर, जेसीआय राजुरा रॉयल्स च्या अध्यक्ष सुषमा शुक्ला, उपसरपंच वासुदेवजी चापले, माजी जि.प. सदस्य भिमरावजी पुसाम, पोलिस पाटील व्यंकटराव मुंडे, स्वतंत्रकुमार शुक्ला सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन चव्हाण, तंमुस अध्यक्ष प्रकाश वेडमे, माजी अध्यक्ष मोतीरामजी पेंदोर, जेष्ठ ग्रामस्थ संभाजी लांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमनाई येमुलवार, ग्राम पंचायतीचे सचिव जी.बी. वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, मुख्याध्यापक परशुराम तोडासाम, ग्रा.प. सदस्य शंकर तोडासे, सोनबती मडावी, वसंत मेश्राम आदर्श शिक्षक बाबा कोडापे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परशुराम तोडासाम यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचलन जसेसीआयच्या सुशिला पुरेडडीवार यांनी केले, सर्व उपस्थितांचे आभार स्वतंत्रकुमार शुक्ला सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत कोडापे, मेंगोराव कोडापे, नितीन मरसस्कोल्हे सुरेश येमुलवार व वसंता सोयाम तसेच गावातील युवक मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!