15 मंत्र्यांना वीज बिलाचा सवलत
15 मंत्र्यांना वीज बिलाचा सवलत
माहिती अधिकारातून खुलासा
चंद्रपूर :(प्रतिनीधी)
सर्वसामान्यांचे हजारो रुपयाच्या वीज बिलामुळे दमछाक होत होती, तेथे राज्यातील मंत्र्यांना गेल्या 4 ते 5 महिन्याची बिले दिली गेली नसल्याची धक्कादायक खुलासा माहिती अधिकारातून झाला आहे. लाकडाउन हाताला काम नाही, त्यात भले मोठे विजेचे बिल पाहून सर्वसामान्यांच्या संकटात भर पडली होती. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना बसला. सर्वसामान्य जनतेची विजबिल कोंडी झाली असताना बड्या मंत्र्यांना विजेचे बिल का पाठवण्यात आले नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे मंत्री आहेत लाभार्थी
लोक निर्माण विभागाकडून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मार्च एप्रिल मे जून आणि जुलै मध्ये राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीज बिलाबाबत माहिती विचारली होती.लोक निर्माण विभागातील दक्षिण उप विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार महासाथीदरम्यान लागू केलेल्या लाकडाऊन मध्ये विजेचे बिल पाठवण्यात आले नाहीत उपलब्ध कागदपत्रांनुसार 15 मे पासून 5 मंत्र्यांना गेल्या 5 महिन्यापासूनची विजेचे बिले पाठवण्यात आलेली नाही. यामध्ये दादाजी भुसे पाडवी अमित देशमुख हसन मुश्रीफ आणि संजय राठोड यांची नावे आहेत. तर गेल्या चार महिन्यापासून जितेंद्र आव्हाड आदित्य ठाकरे धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार उदय सामंत वर्षा गायकवाड गुलाबराव पाटील संदीप घुमरे अनिल परब बाळासाहेब पाटील या मंत्र्यांना विजेचे बिल पाठवण्यात आलेले नाही.
गरिबाच्या जखमेवर चोळले मीठ
सर्व सामान्य ग्राहक विज बिल आने त्रासलेला आहे, नोकऱ्या नाहीत कंपन्या बंद होत आहेत त्यामुळे घर कसे चालवायचे अशी विवंचना सर्वसामान्यांसमोर आहे, अशा स्थितीत सामान्य जनतेला या बिलाचा दिलासा देण्याची मंत्राच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे, हा सर्वसामान्य गरिबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, हे सरकार मोठ्यांची पाठराखण करीत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे.
विज कंपन्यांनाच विचारा: थोरात
लाकडाऊमूळे आधीच मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा बिले पाठवणाऱ्या वीज कंपन्यांनी राज्यातील 15 मंत्र्यांना वीज बिले पाठवली नसल्याचा खुलासा होताच सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राज्यातील राजकारण संतापालाही सुरुवात झाली असल्याचे लक्षात येताच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त प्रतिक्रिया दिली आहे. वीज कंपन्यांनी राज्यातील 15 मंत्र्यांना गेल्या चार पाच महिन्याची वीज बिले का पाठवली नाहीत, हे मला आणि सरकारला विचारण्याची वीजबिल कंपन्यांनाच विचारा, असा उलट सल्ला महसूलमंत्री थोरात यांनी दिला आहे. थोरात यांचे हे वक्तव्य सरकारची अधिकृत बाजू समजावी का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!