समाजोपयोगी नवरंग - शुभांगी कोटनाके, गिर्यारोहि
समाजोपयोगी नवरंग - शुभांगी कोटनाके, गिर्यारोहि
सचिन वाकडे, मुल
संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर, वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे भारतात महिलांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे, वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले, तरी आजहि महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिचा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे युवतीविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे.
मुल तालुक्यातील मुक्काम पडझरी, पोस्ट सोमनाथ या लहानश्या खेडयातील एक युवती, जगातील सर्वात उंच असलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहते. आदिवासी विकास विभाग चंद्रपुरच्या वतीने, तीन आश्रम शाळांची निवड करण्यात आली. शुभांगी शिक्षण घेत असलेली बोर्डा येथील आश्रम शाळेतून तीची निवड करण्यात आली. नोव्हेंबर 2017 मध्ये स्वप्न पुर्ण करण्यासाठी तीच्या पुढिल प्रवासाला सुरुवात झालीे. व्यवसायाने शेतकरी असलेले वडील सुधाकर कोटनाके यांच्या मुलीची शौर्यगाथा हि तालुक्यासाठी गौरवांकित करणारी आहे.
पालकांच्या सहमतीने शुभांगी सुधाकर कोटनाके हया युवतीला मिशन एव्हरेस्टच्या रुपाने हिमालयीन पर्वतारोहण संस्थान दार्जिलिंग येथे समुद्रसपाटीपासून 14,000 फुट उंचीवर गिर्यारोहणाचे व उंचीवरील वातावरणाशी समरस होण्याचे विशेष प्रशिक्षण घेवून ती मिशन एव्हरेस्टसाठी तयार झाली. शुभांगी हि मुल तालुक्यातील पहिली माऊंट एव्हरेस्टची गिर्यारोहि ठरली आहे.
पालकांच्या सहमतीने शुभांगी सुधाकर कोटनाके हया युवतीला मिशन एव्हरेस्टच्या रुपाने हिमालयीन पर्वतारोहण संस्थान दार्जिलिंग येथे समुद्रसपाटीपासून 14,000 फुट उंचीवर गिर्यारोहणाचे व उंचीवरील वातावरणाशी समरस होण्याचे विशेष प्रशिक्षण घेवून ती मिशन एव्हरेस्टसाठी तयार झाली. शुभांगी हि मुल तालुक्यातील पहिली माऊंट एव्हरेस्टची गिर्यारोहि ठरली आहे.
एव्हरेस्ट सर करायला सुरुवात झाली. यात जेवणाची, झोपण्याची आणि टाॅयलेटची समस्या समोर येत गेली. कारण थंडीच्या वातावरणामध्ये जेवण थंड राहत असल्याने, खायची इच्छा राहत नसे. जिथपर्यत दृष्टी जाईल तिथपर्यंत बर्फ आणि केवळ बर्फच दिसायचे. तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने बर्फ विरघडवून त्याचे पाणी तयार करुन प्यावे लागत असे. चुकून जर बाहेर पाणी ठेवले, तर त्याचे क्षणात बर्फात रुपांतर व्हायचे. सकाळ सायंकाळ एक एक बाॅटल गरम केलेले पाणी मिळत असल्याने, झोपतांना स्लिपींग बॅगमध्ये बाॅटल घेवून सर्व गिर्यारोही झोपत असत. झोपायला स्लिपींग बॅग होती. मात्र टाॅयलेट हे लाकडाचे होते.
सर्वदुर केवळ बर्फाच्छादित वातावरण असल्याने संकटही तितकेच भयावह असायचे. भुकंप आला, खोल खाईत पडले, पाउस आला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऐनवेळी ऑक्सिजन कमी झाले तर अश्यावेळेस तिथे दुसरा काहिच पर्याय उपलब्ध नसायचा. झाडांच्या थांगपत्ता नाहि, श्वास घ्यायला होणारी अडचण, अश्यावेळी काम करत नसलेलं डोकं, मग त्यातुन डोकं दुखणे, सर्दी, पोट दुखणे यासारखे आजार उत्पन्न होत असे.
प्रशिक्षणादरम्यान मिशन एव्हरेस्टवाल्यांना स्वत:चा आत्मविश्वास वाढविता आला. शिस्त तसेच टिम मेंबरशी कसं वागावं व त्यांची काळजी घेणे, स्वच्छता, संवादकौशल्य यासारख्या बाबी प्रशिक्षणात शिकता आल्या. जर एखादा व्यक्ती पाण्यात बुडाला तर त्या व्यक्तीला कसं वाचवता येईल, तसेच वेळेवर कोणतेच साधन उपलब्ध नसेल, तर घरगुती वापराचा वस्तुपासून नवीन साधन तयार करुन, सामोरच्या व्यक्तीच्या जिव वाचवणे यासारखे प्रशिक्षण ती घेतली आहे.
जगातील सर्वात उंच असलेला माऊंट एव्हरेस्ट सर करायला निघालेल्या शुभांगीच्या मते, नुसतं जगणं महत्वाचं नाहि. तर त्या जगण्याला उददेश हवा, स्वप्ने असावीत. बाहेरच्या जगामध्ये आपली स्वत:ची ओळख आणि स्वत:चं वेगळं अस्तित्व असायला हवं, असं ती आवर्जुन सांगते.
आदिवासी विकास विभाग चंद्रपुरच्या वतीने नोव्हेंबर 2017 मध्ये माऊंट एव्हरेस्ट गिर्यारोहणासाठी निवड झालेल्या शुभांगीला अपयश आले असले, तरी ती मनाने खचलेली नाहि. पुन्हा संधी मिळाली, तर परत प्रयत्न करुन ते यशस्वी करण्याचे शुभांगीचे स्वप्न आहे. भविष्यात अनेक एडव्हेंचर कोर्स करायचे असलेल्या शुभांगीला तीच्या अनुभवाची पावती म्हणून, चंद्रपुर जिल्ह्यातील इतर युवतींनी यशस्वी केलेल्या मिशन शौर्यमध्ये स्वयंसेवकाचे काम करण्याची संधी मिळाली. ती एडव्हेंचरच्या NAF च्या नेवीगेशन कोर्स केलं आहे.
गिर्यारोहण क्षेत्रात आपले स्वत:चे वेगळेपण जपणारे नाव तसेच स्वत:चे अस्तित्व असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आणी तसे वाटण्यात काहि गैर नाहि. साधारण युवक जिथे माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विचार करु शकत नाहि, तिथे शुभांगीने केलेला प्रयत्न तालुक्याला गौरवांकित करणारा आहे. तीने निवडलेला मार्ग मोठा व खडतर असला तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या शुभांगीला पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा ...!







Congratulations Tai
उत्तर द्याहटवा