बोथली ग्रामसेवकावर दंड व पंचायत समिती तत्कालीन विस्तार अधिकारी यांच्या वर शिस्त भंगाची कार्यवाहीची शिफारस
राज्य माहीती आयुक्तांचे आदेश
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील बोथली येथील प्रकाश नाकतोडे यांनी माहिती अधिकाराकारान्वये अर्ज केला होता केलेल्या अर्जाची अर्जदाराला मुदतीत माहीती न देल्याचा ठपका ठेऊन बोथली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री.एन.ए.नंदनवार यांनी ३०दिवसाचे विहीत मुदतीत उपलब्ध व देय ठरत असलेली माहिती अपिलार्थीस प्रदान केली नाही म्हणुण त्यांना कलम २० (१)नुसार रु २५०००/-(रुपये पंचविस हजार फक्त एवढी शास्ती करण्यात आली आहे तसेच तत्कालीन प्रथम अपिलिय अधिकारी तथा विस्तार अधिकारी(पंचायत) पंचायत समिती लाखांदुर यांनी ४५ दिवसाच्या विहीत मुदतीत निकाली काढले नाही त्या मुळे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १९ (६)चा भंग केला आहे त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन दिनांक १० जून २००८ रोजीचे परिपत्रक व क्र.केमा अर्ज २००७/ ७४/ प्र.क्र१५४/०७/०६ मंत्रालय मुंबई दिनांक ३१ मार्च २००८ च्या परिपत्रकानुसार तसेच कलम १९(८)(ग)व २० (२) अन्वये तत्कालीन प्रथम अपिलिय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पंचायत) विभाग पंचायत समिती लाखांदुर श्री.जी.बी.करंजेकर यांचे विरूद्ध सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट् शासन शिस्त भंगाची कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे अपिलिय अधिकारी यांचे वरिष्ठ अधिकारी खंडविकास अधिकारी पंचायत समिती लाखांदुर यांना पाठविण्यात आले असुन त्यांनी सदरची कार्यवाही करुन त्यासंबधीचा अनुपालन अहवाल दिनांक २३ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केला असुन आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांका पासुन ३० दिवसाच्या मुदतीत आयोगास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!