दिघोरी / मोठी येथे अवैध रेती साठा जप्त

लाखांदूर नायब तहसिलदार देविदासजि पातोडे यांनी केली मोठी कार्यवाही

रेती तस्करांचे दनानले धाबे

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील दिघोरी परिसरातील नदी किनारी असलेला रात्रीच्या वेळी नदिपात्रा मधुन अवैध रित्या ऊपसा करुन  बेकायदेशीरपणे साठवणुक करुन ठेवलेला  रेती साठा जप्त करण्यात आला आहे. अतिक्रमण मध्ये रेती तस्करांनी रात्रीच्या सुमारास  २५ते ३०ब्रास अवैद्ये रित्या रेतीची वाहतुक करुन साठवणुक करुन ठेवली होती आणि दुसर्या दिवशी रात्रीच्याच सुमारास अंधाराचा फायदा घेऊन व कार्यालयीन कामकाज सांयंकाळी बंद होत असल्यामुळे याचाच फायदा घेऊन रेतीला सोन्यासारखी किमंत मिळत असल्यामुळे रेती  तस्करांची संख्या वाढली असुन लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या नादाने अवैद्ये मार्गाने वाहतुक करुन साठवणुक करुन ३००० ते४००० रुपये ब्रासच्या भावाने विक्री केल्या जाते मात्र दि.२२/१०/२०२० रोज गुरुवार ला लाखांदुर तहसिल चे नायब तहसिलदार देविदासजि पातोडे यांनी  दुपारच्या दरम्यान ०३ते ०५ वाजेच्या दरम्यान अवैद्ये रित्या साठवणुक केलेला रेती साठ्याचा पंचनामा करुन तहसिल कार्यालय लाखांदुर येथे जमा करण्यात आला असुन रेती तस्करांचे धाबे दनानले आहेत. लाखांदुर तालुक्यातील दिघोरी /मोठी परिसरातील ही सगळ्यात मोठी कार्यवाही आहे असी जनसामांन्या मध्ये चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!