देवीला कुंकुमार्चन करण्याचे महत्त्व

देवीला  कुंकुमार्चन करण्याचे महत्त्व 

  हिन्दू धर्मात भगवतिदेवीची विशेष आराधना वर्षातुन दोन वेळा केली जाते 
१)वासन्तिक नवरात्र 
२)शारदीय नवरात्र 

सौ.भारती कोंतमवार,मुल

दिनांक १७ ऑक्टोबर पासून शारदीय  नवरात्र सुरु झाले आहे.
नवरात्रीतील  पहिले तीन दिवस 
तमोगुण कमी करण्यासाठी महाकालीची,दूसरे तीन दिवस सत्वगुण वाढविण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची व शेवटचे तीन दिवस साधना वाढविण्यासाठी सत्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
     नवरात्री मध्ये देवीला कुंकुमार्चन करण्याचे अधिक महत्व आहे. देवीचे नामस्मरण करीत एक एक चिमुट कुंकु देवीच्या चरणापासुन डोक्यापर्यंत वाहत यावे किवा तिला कुंकवा ने स्नान घालावे यालच कुंकुमार्चन असे म्हणतात
कुंकुमार्चन करण्यामागील शास्त्र असे आहे की शक्तितत्त्वाची निर्मिती लाल प्रकाशांतुन झाली आहे. कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची  क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मुर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तितील शक्तित्त्व कुंकवाममध्ये येते नंतर ते कुंकू स्त्रियांनी लावल्यास त्यातील शक्ति त्यांना मिळते.
म्हणून देवीतत्व अधिकाधिक ग्रहण करण्याकरिता कुंकुमार्चन करणे महत्त्वाचे आहे.
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!