चिमूर शहरात २४ तास पाणी पुरवठा योजनेचे काम एका महिन्यात सुरू होईल - आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया
चिमूर येथील रुकुडगिर मंदिर, संत गोरोबा कुंभार सभागृहाचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - दिनांक २३/१०/२०२० ला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी ऊर्फ किर्तिकुमार भांगडिया यांचे कडून विविध सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. जेव्हा जेव्हा परमेश्वराकडे मागणी करीत असतो तेव्हा परमेश्वर भरपूर मला देतो . माजी जि.प.सदस्य स्व. शालू येळणे काकू यांची आठवण काढीत त्यांची सन २०१२ ची सभागृह मागणी पूर्ण केली असल्याचे सांगत येळणे काकू हयात नसल्याची खंत व्यक्त करीत या परिसरातील पिण्याच्या पाणी ची फार मोठी अडचण आहे . हि मला माहित आहे. ५८ कोटी रुपयांची पाण्याची योजना आणली.परंतु न.प. मध्ये सत्तांतर झाल्याने विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली.न्यायालयात जिंकून सुद्धा राज्यातील सत्तेने रोखून ठेवले आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास हेच आपले ध्येय असून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने ९०० कोटी रुपयांची विकास कामे रोखून ठेवले आहे.येत्या एक ते दिड महिन्यात चिमूर शहरात २४ तास पाणी पुरवठा योजना सुरू करणार असल्याची ग्वाही आमदार बंटी भांगडीया यांनी दिली. संत गोरोबा कुंभार सभागृहाचे लोकार्पण सोहळा आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच चिमूर येथील रुकुडगिर मंदिर सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याला जी.प. उपाध्यक्ष सौ.रेखाताई कारेकर , डॉ. श्यामजी हटवादे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ चे सर्वाधिकारी प्रकाशपंत वाघ महाराज, राजू देवतळे बकारामजी मालोदे, बंडू नाकाडे, पांडुरंग हजारे ,राजू दांडेकर , तसेच कुंभार समाजाचे नेते, पत्रकार गणपत खोबरे आदी उपस्थित होते.संचालन जयंत गौरकर यांनी केले. राजू देवतळे प्रकाश पंत वाघ महाराज यांनी मार्गदर्शन केले. आभार राजू दांडेकर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास परिसरातील नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!