बहुजन विद्यार्थी संघटनातर्फे पितृछत्र हरविलेल्या 'श्रुती'स शैक्षणिक मदत
बहुजन विद्यार्थी संघटनातर्फे पितृछत्र हरविलेल्या 'श्रुती'स शैक्षणिक मदत
सिंदेवाही (सचिन वाकडे)
बहुजन विद्यार्थी संघटना तालुका सिंदेवाहीच्या वतीने गरीब, गरजू व पित्रूछत्र हरविलेल्या सिंदेवाही शहराजवलील रेल्वे स्थानक परीसरातील पितृछत्र हरविलेल्या एका गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थीनिस शालेय पाठ्यपुस्तक संच व नोटबुकसचे वितरण करुन शैक्षणिक मदत करण्यात आली.
सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही परिसरातील कु. श्रुती वसंत भडके ही विध्यार्थीनि इयत्ता दहावीमध्ये नागपूर येथील निवासी शाळा व वसतिगृहात शिकत असून तिची आई रोजंदारीवर मजुरीचे काम करून आपल्या परिवाराचा उदारनिर्वाह चालवीत आहे. कोरोना संकटामुळे टाळेबंदी असून श्रुतीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे बहुजन विद्यार्थी संघटना सिंदेवाहीच्या निदर्शनास आले.
सामाजिक दायित्व राखत श्रुतीचे शैक्षणीक नुकसान भरुन निघावे व अभ्यासात गती यावी,या ऊद्देश्याने संघटनेच्या वतीने तिला दहावीचा सम्पूर्ण पाठ्यपुस्तक संच व शालेय नोटबुक्स देऊन एक शैक्षणिक मदतीचा हात पुढे करन्यात आला.
बहुजन विद्यार्थी संघटनाच्या माध्यमातून यापूर्वीही 10 वि तथा 12 वि च्या विद्यार्थीसाठी इंग्रजी, गणित मार्गदर्शन केंद्राची सुविधा, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाची उपलब्धी, आय.टी .आय. समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेध, शासकीय वसतीग्रुह विद्यार्थी प्रवेश मिळवून देणे, गुणवंत विद्यार्थी सत्कार करणे तसेच नवोदय, शिष्यव्रुत्ती परीक्षा पूर्व मार्गदर्शन केंद्र संचालित करणे आदी विद्यार्थी हिताचे शैक्षणिक नि सामाजिक कार्य तडीस नेलेलेे आहे.
या मदतीकरिता बहुजन विद्यार्थी संघटना सिंदेवाहीचे तालुका अध्यक्ष इंजि. सचिन शेंडे, बामसेफचे प्रा. भारत मेश्राम व अध्यापक विलास टेम्भूर्णे आदींनी मोलाचे सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!