१६ ऑगस्ट शहिद स्मृती दिनी चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती तर्फे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना चिमूर जिल्ह्याच्या मागणीचे दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - १६ ऑगस्ट शहिद स्मृती दिनी चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती तर्फे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना चिमूर जिल्ह्याच्या मागणीचे निवेदन दिले असून चिमूरच्या क्रांतीकारकांच्या अलौकिक शौर्याची साक्ष देणारे शहिद स्मारक,हुतात्मा स्मारक,डाक बंगला,लोखंडी पूल आजही भारतीयांना स्वातंत्र्याचे नवचैतन्य देतात." चिमूरचा दिंगा" म्हणून हा क्रांतीलढा इतिहासात अजरामर आहे.या क्रांतीलढ्यात शहिद झालेल्या क्रांतीवीरांना नमन करण्यासाठी दरवर्षी १६ अॉगष्टला जनसागर उसळतो.अनेक महनिय मंडळी चिमूरला शहिदांना वंदन करण्यासाठी येतात.
चिमूरला आतापर्यंत देशाचे महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री,अनेक केंद्रीय मंत्री,सिने कलावंत येऊन गेले.येथील जनतेची चिमूर जिल्ह्याची अनेक वर्षांची मागणी आहे.मागील तीन दशकांपासून चिमूरला क्रांतीजिल्हा घोषित करण्यात यावा,याकरिता विविध आंदोलने करण्यात आली.मात्र आजतागायत चिमूर जिल्ह्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.संपूर्ण देशात ज्या चिमूरने आपल्या अभूतपूर्व लढ्याने स्फुल्लिंग चेतविले,सा-या देशाला क्रांतीचा मूलमंत्र दिला त्या चिमूरच्या क्रांतिभूमीला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा.चिमूर क्रांतिजिल्हा घोषित होणे हिच शहिदांना खरी श्रद्धाजंली ठरेल....!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!