कृषी महाविद्यालय मारोडा येथे वृक्षारोपणाने स्वातंत्र्य दिन साजरा
कृषी महाविद्यालय मारोडा येथे वृक्षारोपणाने स्वातंत्र्य दिन साजरा
सचिन वाकडे, मुल
भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन कृषी महाविद्यालय व कृषी तंत्र विद्यालय मुल मारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. विष्णुकांत टेकाले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नारळ, आंबा, चिकू, पेरू, तसेच विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी प्रा. डॉ. विष्णुकांत टेकाले, डॉ. विजय काळपांडे, सुनील धोटे, खूपचंद भक्तवर्ती, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य शेषराव गजघाटे, प्रा. दडमल, वर्षा काटेखाये व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!