स्वातंत्र्य दिनी लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पत्रकार संघाचे वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - कोरोनाचे पार्शवभूमीवर सोसिअल व फिजिकल डिस्टंसीग चे पालन करीत दिनांक. १५ ऑगस्ट २०२० , भारतीय स्वतंत्रता दिवसाच्या उत्सवा निमित्ताने तहसील कार्यालय लाखांदूर च्या प्रांगणात, तहसीलदार संतोष महाले यांचे हस्ते ध्वजारोहण सकाळी ९:०५ वा करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाचे वतीने मानवंदना देण्यात आली. त्यावेळी तहसील कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी, शहरातील गन्यमान्य प्रतिष्ठित उपस्थित होते. त्यानंतर तहसीलदार संतोष महाले यांचे प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पत्रकार संघ भंडारा शाखां लाखांदूर च्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम ९:३० वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आला. सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला पं स लाखांदूर चे बीडीओ गजानन अगर्ते, नायब तहसीलदार मेहर, नायब तहसीलदार बंडू पाथोडे, ठाणेदार शिवाजी कदम, पीएसआय कुलसुंघे, पीएसआय ताराम, पीएसआय कोकाटे, सभापती मंगला बगमारे, मनोज बन्सोड, तरोणे सर, अरविंद टेम्भूरने सर, जिक्रिया पठाण, मोहन भावे, बाळूभाऊ नाकतोडे, ज्ञानेश्वर लांजेवार सर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुनील बारसागडे, प्रकाश नाकतोडे, कमलेश बोरकर, कावळे सर, रोशन फुले, पवन समरीत हे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!