नागरिकांनी रस्त्यावरील खड्यात लावले बेशरमाचे झाड; रोज होतात तिथे किरकोळ अपघात..!
नागरिकांनी रस्त्यावरील खड्यात लावले बेशरमाचे झाड; रोज होतात तिथे किरकोळ अपघात..!!
नागभीड :पराग भानारकर,
दि.16/8/2020
आदर्श कॉलोनी व विद्या नगर कॉलोनी मधील नागरिकांनी राम मंदिर ते शिवटेकडी कडे जाणाऱ्या मार्गावरील खड्यात आज बेशरमाची झाडे लावली... सदर रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा किरकोळ अपघात झाले आहेत तर अनेक गाड्या क्षतीग्रस्त झाल्या आहेत...सध्या पावसाळ्याचे दिवस असून यात पाणी साचल्याने वाहन गेले की पाणी पायी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पडतो त्यामुळे अनेक वेळा वाहन चालक आणि पादचारी यांच्या मध्ये बाचाबाची सुद्धा झाली आहे...तसेच दोन दिवसांपूर्वी एक मुलगा इथे होणाऱ्या एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे.. ग्रामीण रुग्णालय नागभीड,तहसील ऑफिस नागभीड,तालुका न्यायालय, कोविद केअर सेन्टर,गोविंदराव वारजूरकर महाविद्यालय नागभीड या सर्व ठिकाणी याच रस्त्यावरून जावे लागत असल्याने प्रशासनाला या रस्त्यावरील खड्ड्याचे गांभीर्य कळू नये? हा प्रश्न नागरिकांनी केला आहे.. तसेच नागभीड चे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुद्धा याच रस्त्याने आपल्या महाविद्यालयात जातात... अनेक दा त्यांच्याही ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही कुठल्याच प्रकारची भूमिका न घेतल्याने नागरिकांनी आज बेशरमाची झाडे लावली तसेच या ठिकानी कुठलीही अनुचित घटना घडल्यास आणि त्यात बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का..? असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला....!!!!
तसेच राम मंदिर ते प्रियदर्शनी इंदीरा गांधी चौक पर्यन्त जाणारा रस्ता सुद्धा पूर्णपणे खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत तसेच नागभीड पोस्ट ऑफिस कडे जाणारा रस्ता सुद्धा चिखलाने माखलेला आहे... नागभीड मधील अंतर्गत रस्त्याची परिस्थिती सुद्धा अत्यंत वाईट आहे... काही कॉलोनी मध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर काही ठिकाणी पाणी साचले आहे... यातून विविध आजारांचा फैलाव होऊ शकतो... सध्या कोरोना संक्रमणाचा काळ असल्याने दुसरे आजार डोकेदुखी ठरू शकतात.. अशी भीती नागरीकामध्ये निर्माण झाली आहे..!!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!