चिचाळा भूमिगत पाईपलाईन शेतकऱ्यांसाठी वरदान!
चिचाळा पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी विदर्भामधील पहिली योजना.
सहा महिन्यांमध्ये 24 .25 कोटी आणि 13.47 हेक्टरचे काम पूर्ण केले.
मुल (प्रकाश चलाख)
चिचाळा ग्रॅव्हिटी पाइपलाइनद्वारे ही विदर्भा मधील जुलै महिन्यामध्ये कार्यान्वित झालेली पहिली योजना आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये खरीप- रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात आले. सदर योजना ही असोलामेंढा कालव्यांमधून पाच कि.मी.पीव्हीसी पाईप द्वारे नदीपात्राच्या खालून चिचाळा गावांमध्ये ग्रॅव्हिटी द्वारे करण्यात आलेली आहे.
मूल तालुक्यातील चिचाळा व लगतच्या सहा गावांना शेती सिंचनासाठी कुठलीही सोय उपलब्ध नसल्याने येथील धान उत्पादक शेतकरी निसर्गाच्या भरोशावर शेतीचे उत्पन्न घेत होते. परंतु निसर्गाचा लहरीपणामुळे अनेकदा आपले उत्पन्न घेणे कठीण बनले होते. त्यामुळे येथील धान उत्पादक शेतकऱ्यांनी कित्येक वर्षापासून शासनाकडे उंबरठे झिजवले होते.
मूल- बल्लारपूर निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय नेते, विकास पुरुष माजी मंत्री या क्षेत्राचे प्रतिनिधत्व करत असलेले विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी रेटून धरली. येथील धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा बघता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न मार्गी लावून भूमिगत पाइपलाइनद्वारे शेती सिंचनासाठी चांदा ते बांदा योजने मधून हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा संकल्प केला.
चिचाळा येथून जंक्शन स्ट्रक्चर (junction structure) बांधून त्यामधून 4 मेन लाईन एचडीपीई (HDPE)पाईप द्वारे त्याचा चार पाणी वापर संस्था तयार करून सहा गावांना चिचाळा, हळदी, दहेगाव, मानकापूर ,ताडा ला, वेडीरीठ व गावगन्ना यागावांनापाइपलाइनद्वारे13.47 सेक्टर मध्ये सिंचनासाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे.
सदर योजना ही ग्रॅव्हिटी द्वारे असल्यामुळे यासाठी वीजबिल व इतर सामग्रीची बचत झालेली आहे.
सदर योजना ही "चांदा ते बांदा" अंतर्गत पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार व श्री धोंडे साहेब यांनी पूर्ण मदत केलेली आहे.
तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचे अधिकारी मुख्य अभियंता श्री स्वामी साहेब, अधीक्षक अभियंता श्री वेमुल कोंडा साहेब, कार्यकारी अभियंता श्री सोनवणे साहेब, व श्री काळे साहेब तसेच उपविभागीय अभियंता श्री धोत्रे साहेब, व श्री सोनेकर साहेब यांनी सहकार्य केले.
सदर कामे ही एन. एन. के .कन्स्ट्रक्शन पुणे यांचे मार्फत पूर्ण केले असून कंपनीचे अधिकारी श्री राठोड साहेब यांचे मोलाचे योगदान आहे. सदर प्रकल्पाबाबत परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
Show quoted text



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!