निराधारांच्या सहवासात शार्दुल पचारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मौजा जामगाव येथील दिव्यवंदना आधार फाउंडेशन व मराठा लाईफ फाउंडेशन वृद्धाश्रमात श्री. शार्दुल दिलीप पचारे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
यावेळी शार्दुल पचारे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांसमवेत वृद्धाश्रमाला भेट देत तेथील निराधार ज्येष्ठांसोबत आनंदाचे क्षण वाटले. वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील निराधारांना स्वादिष्ट नाश्त्याचे वाटप करण्यात आले. नाश्ता घेताना ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थितांचे मनही भारावून गेले.
वाढदिवसाच्या या विशेष प्रसंगी वृद्धाश्रमातील निराधारांनी नृत्य सादर करून वातावरण अधिक आनंदमय केले. त्यांच्या उत्साहामुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले.
यावेळी शार्दुल पचारे तसेच त्यांच्या आई-वडिलांनी वृद्धाश्रमातील निराधार व्यक्तींची आपुलकीने विचारपूस करत त्यांच्या परिस्थितीची जाणून घेतली. समाजातील वंचित आणि निराधार घटकांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा मानस पूर्ण झाल्याने पचारे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
समाजाप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!