मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 जुलै रोजी मूल शहरात येणार? प्रशासन अलर्ट मोडवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 जुलै रोजी मूल शहरात येणार? प्रशासन अलर्ट मोडवर


मूल : राज्याचे मुख्यमंत्री  हे 3 जुलै रोजी मूल शहरात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मूल हे पैतृक गाव असून येथे त्यांचे पारंपरिक निवासस्थान असून ते "फडणवीस वाडा" या नावाने ओळखले जाते.
कोटुंबिक पूजेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री मूल येथे येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली असून सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी प्रशासन स्तरावर अंतर्गत नियोजन व तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि इतर बाबींचा आढावा घेतला जात असल्याचे समजते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मूल भेटीकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!