आजच्या आधुनिक काळात आपली संस्कृती इतिहास टिकवुन ठेवणे काळाची गरज - चौधरी सर

आजच्या आधुनिक काळात आपली संस्कृती इतिहास टिकवुन ठेवणे काळाची गरज
- चौधरी सर


पळसगांव येथे नागदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमुर तालुक्यातील व मासळ येथून जवळच असलेल्या पळसगांव  येथे नागदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक १४ डिसेंम्बर ला सायंकाळी ६ वाजता मा मानिका देवी मातेचे मा दासरथजी दडमल व माना जेष्ठ जमात बंधवांच्या हस्ते विधिवत पूजन करून घट स्थापणा करण्यात येहून रात्रौ ला जागृती पार भजने सादर करण्यात आले,त्या नंतर दिनांक १५ डिसेंम्बर ला सकाळी ९ वाजता गावातून वाजत गाजत मंगल मिरवणूक काढण्यात आली,व सायंकाळी ६ वाजता मान्यवरांचे मार्गदर्शना चा कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  वर्षा लोणारकर माजी पंचायत समिती सदस्य,उपदयक्ष गीता कारमेंगे पंचायत समिती सदस्य चिमूर,प्रमुख पाहुणे माजी आमदार रमेशकुमार गजभे,चौधरी सर,सरपंच गीता शेंडे,गूळधे सर,धारने सर,भारत जांभूळे,सौ.रागिना दडमल पोलीस पाटील, सचिन बन्सोड,हे उपस्थित होते.माना आदिम ग्राम शाखा आदिवासी युवा संघटना पळसगांव च्या विद्यमाने नागदिवाळी चे आयोजन करण्यात आले होते यात कुलदैवताची खनपूजा,पुज्यनिय मानिका माता,स्वातंत्र्य विर बिरसा मुंडा, आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्यनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रम हा गावातील सार्वजनिक जागेवर परिसरात घेण्यात आला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना म्हणाले की आज माना समाजाची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे त्यामुळे माना समाज बंधुनी आपली एकता अशीच टिकहुन ठेवावि,चैधारी सर यांनी आपल्या आजच्या आधुनिक काळात आपली नागवंशीय संस्कृती इतिहास वाचून जपून ठेवणे काळाची गरज आहे,कारण आजच्या माना समाजाला त्यांचा ईतिहास माहीत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे सुचक वाक्य म्हणाले होते की ज्यांना त्यांचा ईतिहास माहित नाही ते नवा इतिहास घडवु शकत नाही आपण नागवंशीय माना समाजाचे आहोत आपल्या समाजाचा शौर्याचा त्यांच्या राजसत्तेचा त्यांच्या आदर्श नगररचनेचा त्यांच्या कलाकुसरीचा ईतिहास असतांना आपण विसरलेले आहोत आणि म्हणून सर्वात आधी तो ईतिहास आपण शोधला पाहिजे व समजून घेतला पाहिजे पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन मा चौधरी सर यांनी केले.ते पुढे बोलताना म्हणाले की नागवंशीय माना राजा कुरूम प्रहोद यांनी वैरागड,राजगड,राजोली ईत्यादी ठिकाणी किल्ले बांधले, सुरज बडवाईक यां माना राजाने सुरजागडचा किल्ला बांधला, गहिलु व माना राजाने मानिकगडचा किल्ला बांधला, नेरी, चिमुर,शंकरपुर ई.गावात गढी बांधकाम केले याचा मागोवा घेतला तर सिंधू संस्कृतीचा किल्ला व नगर बांधकामाचे काही प्रमाणात नागवंशीय माना राज्याच्या बांधकामाशी साम्य आहे असे दीसते ई.स.पुर्व ४७० ते ई.स.१३ व्या शतकापर्यंत च्या किल्ला बांधकामाशी सिंधू संस्कृतीच्या बांधकामाशी साम्य दिसते तात्पर्य हे की संबंध जगाने सिंधु संस्कृती प्रगत संस्कृती म्हणून जगाने मान्यता दिली तिच्याशी नागवंशीय मानांंचा संबंध असणे ही अत्यंत महत्वपुर्ण बाब आहे हे आपण समजुन घेतले पाहिजे असा ईतिहास आहे. आपल्याला अजून आपल्या सोयी सवलती मिळविण्यासाठी खरी मेहनत करावी लागणार असून,आपल्या समाज बांधवांना जे की कास्ट व्यालिडीटी साठी झगडावे लागत असून अजून आपल्या ला संघटीत राहणे गरजेचे आहे असे मत गजभे साहेब प्रमुख पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी गावभोजन देण्यात आले गावकऱ्यांनी सामुहीक भोजनाचा आस्वाद घेतला, संचालन मा,बरडे सर यांनी केले. आभार  प्रदर्शन मा,महादेव दडमल यांनी मानले रात्रोला ग्रामीण लोकजागृती रामायण(दंडार,चांग्या बेरड )चा कार्यक्रम करण्यात आला.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भजन मंडळ मदनापूर,सूर्यवशी सर,किशोर दडमल,मारोती गुळधे,शत्रद्न्य गूळधे,तुळशीदास शेरकुरे,गोपीचंद गूळधे,अरविंद घरत, रामभाऊ चौधरी,रामभाऊ चौधरी,रामदास घराटे,हरीचंद्र गूळधे,सुभाष गूळधे,गणेश गुळधे,अर्चना गुळधे ,वंदना गूळधे,कल्पना दडमल,मनीषा गूळधे आदिंनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!