प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक भवन बांधकाम करून देणार - आमदार बंटीभाऊ भांगडीया
प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक भवन बांधकाम करून देणार
- आमदार बंटीभाऊ भांगडीया
प्राथमिक शिक्षकसंघ अधिवेशन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर परिसरातील राजकिय क्षेत्रात शिक्षकवर्गाचे सुद्धा अप्रत्यक्ष सहकार्य लाभत असल्याचे सांगत या क्षेत्रात एका चिन्हावर दोन वेळा विजयी होण्याचा मान मिळाला तो ही राजकारणात नसलेल्या शिक्षक वर्गाकडून सहकार्य मिळाले विश्वास जो दाखविला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगत शिक्षणाच्या प्रत्येक समस्या प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी दिली आणि संघाच्या शिक्षकसभागृह बांधकाम करण्यासाठी शिक्षकभवन करून देणार असल्याचे सुद्धा आश्वासन दिले .अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिमूर च्या त्रैवार्षिक अधिवेशन तथा सत्कार समारोह कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे नगरसेवक अब्दुल कदिर शेख , सेवानिवृत मुख्याध्यापक ग म वरघणे , राजू देवतळे अनिल अलसरे, शिक्षक संघ जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी पारोध्ये मनिष तुंम्प्लिवार संजय नवघडे संजय कुंभारे भाजप शहर महामंत्री सुरज नरुले शिक्षक संघ तालुका संघ उल्हास वरघणे आदी उपस्थित होते .दरम्यान आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचे सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले संघर्ष स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले .साहित्य क्षेत्रात कार्यरत तंत्रस्नेही शिक्षकाचे सुद्धा सत्कार करण्यात आले . सविता झाडे लिखित काव्यसंग्रह चे विमोचन करण्यात आले .संचालन सविता झाडे यांनी केले संघाचे शिक्षकवृंद उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!