श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती मुल च्या अध्यक्ष पदाचा नितीन येरोजवार यांचा राजीनामा
श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती मुल च्या अध्यक्ष पदाचा नितीन येरोजवार यांचा राजीनामा
मुल येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मंदिर हनुमान मंदिर तलाव पाळ चे 15 वर्षापासून अध्यक्ष श्री नितीन येरोजवार यांनी आज तडकाफडकीने राजीनामा मंडळाचे सचिव श्री . विजय बटे यांना पाठविला आहे .
मागील 15 वर्षापासून मुल येथील स्वामी समर्थ महाराज मंदिराची स्थापना नितीन येरोजवार यांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत यशस्वी पणे करण्यात आली या मंदिराच्या निमित्याने हजारो भाविक मंदिराला जुळले गेले सर्व पदाधिकारी व सदस्य मिळून सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडीत होते मागील काही वर्षापासून काही गोष्टी घडत होत्या त्या अध्यक्ष पदाला पचनी पडीत नव्हत्या . श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समितीचे अध्यक्ष श्री नितीन येरोजवार हे इमानदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात व त्यांच्या स्वामी समर्थ मंडळाचा आर्थिक व्यवहार कडक शिस्तीमध्ये ठेवत होते त्यामुळे आज मंदिराची ठेवी मुबलक व सुरळीत आहे ,
नितीन येरोजवार आपली प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी या मंडळासाठी आपले निस्वार्थ कार्य 15 वर्षापासून स्वामी चरणी अर्पण करून सेवा केलीच आहे त्यामुळे मी आज या शिखरावर पोहचलो आहो हे मी कधी विसरू शकत नाही परंतु काही अपरिहार्य कारणाने अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहो तरी माझे नाव तसे माझा उल्लेख कोणत्याही मंडळाच्या समितीत करू नये व कोणत्याही सदस्याला दोष देत नाही कारण सर्व स्वामी भक्त आहे सर्व निस्वार्थ सेवा करतात,असे आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!