तलाटी संपावर तर रेती तस्करांचा अवैध रेतीवर धुमाकुळ

तलाटी संपावर तर रेती तस्करांचा अवैध रेतीवर धुमाकुळ


जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - तलाटी संपावर असल्याने चिमुर तालूक्यात रेती तस्कारांचा धुमाकुळ सुरु झाला आहे.भिसी,शंकरपुर,जांभुळघाट,नेरी,परीसरात,रात्रो व दिवसा रेती तस्करी होत आहे. जांभुळघाट मध्ये सरकारी नाली चे काम सुरू असल्यामुळे कंत्राटदार हे चोरीच्या रेती चा वापर करीत आहे. ट्रॅक्टर द्वारे या कामावर रेती टाकण्यात येत आहे. हे ट्रॅक्टर पारडपार या गावातील असल्याची चर्चा आहे. बऱ्याच दिवसा पासुन या परीसरात रेती तस्करी होत आहे. आता तर तलाटी संपावर असल्याने बिनधास्त रेती तस्करी रेती माफिया करीत आहे. कंत्राटदाराने चोरीच्या रेतीचा वापर करीत असून त्यांच्यावर महसुल विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे. सामान्य जनतेनी रेती चोरीची वापरली कि त्यावर तात्काल कारवाई होत असते. अशी सुद्धा सामान्य जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.तर कंत्राटदाराने नियमाने रेतीची रॉयल्टी व नियमानुसार रेतीचा वापर करायला पाहीजे. बिला मध्ये रॉयल्टी जोडावी लागतात. पण हे कंत्राटदार चोरीच्या रेतीचा वापर करीत असतील तर त्या बिलात मध्ये कोणत्या तारखे ची रॉयटी जोडत असतात.हि एक आश्चर्याची बाब आहे.महसुल अधिकाऱ्यानी या कामा वर टाकलेल्या रेतीची चौकसी करून योग्य त्या पद्धतीने महसुल गोळा करावा अशी मांगणी जनतेकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!