लावारी ( म ) येथील शालेय विध्यार्थ्यांचे स्कॉलरशिप खाते बँक ऑफ इंडिया नेरी शाखेने काढुन द्यावे -लावारी वासियांची मागणी

लावारी ( म ) येथील शालेय विध्यार्थ्यांचे स्कॉलरशिप खाते बँक ऑफ इंडिया नेरी शाखेने काढुन द्यावे - लावारी वासियांची मागणी


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमुर तालुक्यातील येथून जवळच असलेल्या लावारी (म)येथील शालेय विध्यार्थ्यांचे स्कालरशिप साठी लागणारे बँक पासबुक हे बँक ऑफ ईंडीया नेरी शाखेने काढुन द्यावे अशी जोरदार मागणी लावारी वासीयांनी प्रशासनातील संबंधित अधिकारी यांना एका निवेदनातुन केली आहे.9सविस्तर माहिती या प्रमाणे आहे की लावारी गावातील सर्व नागरीकांचे व शाळेचे तसेच ग्रामपंचायत चे बँक खाते बँक आँफ ईंडीया शाखा नेरी येथे काढले आहेत मात्र लावारी (म )शालेय विध्यार्थ्यांना स्कालरशिपसाठी बँक पासबुक हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिमुर येथे काढण्यास सुचविले आहे, तशी यादी बँक ऑफ इंडिया नेरी यांनी प्रसिद्ध केली आहे. लावारी गावातील सर्व नागरीकांचे बँक पासबुक बँक ऑफ इंडिया शाखा नेरी येथे असतांना शालेय विद्यार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिमुर येथे काढण्यास कसे काय सुचविले आहे. लावारी येथून  नेरीची बँक ऑफ इंडिया दहा किलोमीटर अंतरावर आहे हे शालेय विद्यार्थी यांना परवडणारे आहे तर लावारी पासून चिमुर हे अंतर २० किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे चिमुरला जावुन बँक ऑफ महाराष्ट्र येथे पासबुक काढणे शालेय विद्यार्थ्यांना जिकरीचे आणी फार मोठ्या त्रासाचे होणार आहे नेरी हे गाव लावारी वासीयांची मुख्य बाजारपेठ आहे येथील ईंडीया शाखेत नागरीकांचे व्यवहार चालत असतात नेरी परिसरातील २९ खेड्याना बँक ऑफ इंडिया शाखेत जोडले आहे मात्र लावारी येथील विद्यार्थ्यांना चिमुरच्या महाराष्ट्र बँकेत पास बुक काढण्यास सांगीतल्याने विद्यार्थी पालक यांच्यामध्ये नेरीच्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे तेव्हा नेरीच्या ईंडीया शाखा व्यवस्थापकांनी याची दखल घेवून शालेय विद्यार्थ्यांचे स्कालरशिपचे पासबुक बँक ऑफ इंडिया शाखेत काढून देण्यात यावे अशी मागणी लावारी वासीयांनी तेथील शालेय विद्यार्थ्यांनी  बि.डी.ओ.चिमुर, सि.ई.ओ.चंद्रपूर, बि.ई.ओ.चिमुर,जिल्हाधिकारी चंद्रपूर, आणी आमदार साहेबांकडे निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा गावकरी कोणते पाऊल उचलेल हे आताच सांगता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!