उमानदी घाट शिवणी रोड रत्नापुर येथे भव्य बौद्ध धम्म मेळावा साजरा

उमानदी घाट शिवणी रोड रत्नापुर येथे भव्य बौद्ध धम्म मेळावा साजरा 


पळसगाव  -  प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पाळसगाव : -  चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील धम्म भूमी उमा नदी घाट शिवणी रोड रत्नापुर येथे भव्यदिव्य धम्म भूमी मेळावा साजरा झाला,रत्नपुर शिवणी मधील निसर्ग रम्य ठिकाणी स्त्री मुक्त दिनेच्या दिवशी दरवर्षी धम्म भूमी सेवा समिती मार्फत २५/१२/२०१९  ला बौद्ध धम्ममेळावा चे आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा करण्यात आला.या कार्यक्रम सकाळी ११ वाजता
भिक्कु संघाची धम्म देशना ,धम्म ध्वजारोहण करण्यात आले, म्हाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून  समता सैनिक दल शाखा,लोणवही शिदेवाही येथील समता सैनिक दलाच्या वतीने सन्मानपूर्वक  मानवंदना देवून कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक भदंत, इ झेड खोब्रागडे सनदी अधिकारी , डॉ. दीपक खोब्रागडे सेवचंद नागदेवते सर ,कांबळे सर, होते,बुद्ध धम्म खऱ्या अर्थाने आपल्या आचरणात आणलं तरच बुद्ध धम्म व पंचशीलच्या मार्गाने चालेल पजिजे तरच समाजाची प्रगती होईल. दररोज विहारत वंदना
झाली पाहिजे डॉ:बाबासाहेब यांच्या विचारावर समाज गेला पाहिजे.असे प्रतिपादन मान्यवरांनी केले, धम्म भूमी मेलवाचे औचित्य साधून समाज प्रबोधनपर कार्यक्रम शुद्ध करण्यात आला.मिनघरी येथील तरुण गायकाला या वर्षी संधी मिळाली व त्यांनी व त्यांच्या संच यांनी आपल्या सुंदर आवाजातून बुद्ध भीम गीते सादर करून समाज  प्रबोधनपर कार्यक्रम साजरा करण्यात आला, शेवटी सर्व धम्म बांधव व भगिनीना स्नेहभोजनाचा आंनद घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म भूमी विकास समिती अद्यक्ष व सर्व समिती यांनी मोलाचे काम यांनी मेहनतिने घेतली. परिसरातील बौद्ध बांधव मागील मंडळ  तसेच उपासक उपसिका होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!