रेती तस्करांचे धाबे दणाणले; तहसील कार्यालय मूलच्या पथकाची मध्यरात्री धडक कारवाई
रेती तस्करांचे धाबे दणाणले; तहसील कार्यालय मूलच्या पथकाची मध्यरात्री धडक कारवाई
मूल : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात तहसील कार्यालय मूल येथील अवैध गौण खनिज पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करत चार वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
दिनांक 22 जून 2026 रोजी तहसील कार्यालय मूल येथील अवैध गौण खनिज पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणी तपासणी केली. यावेळी राजोली रेती घाट परिसरातून पोकलँड क्र. PUNGD20AJR3424734 हे वाहन तसेच हायवा क्र. MH-34 CV 3155 हे वाहन आढळून आले.
तसेच डोंगरगांव-भादुर्णी रोड परिसरातून हायवा क्र. MH-34 CQ 6755 आणि डोंगरगांव-राजोली रेती साठ्याजवळील रस्त्यावरून हायवा क्र. MH-34 CV 4955 या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
सर्व वाहने तहसील कार्यालय मूल येथे जमा करण्यात आली असून पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईची मोहीम सुरू असून या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!