जनकापुर येथे विजेचा कहर; गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळून बैल जागीच ठार
तळोधी (बा.) : आज दुपारी सुमारे तीन वाजताच्या दरम्यान चक्रीवादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. याच दरम्यान नागभीड तालुक्यातील जनकापुर येथील शेतकरी श्रीराम गुरुनुले यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळली. गोठ्यात बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे शेतकरी श्रीराम गुरुनुले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!