गुरुदेव सेवा मंडळ पळसगांव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी तथा ज्ञानयज्ञ भागवत सप्ताह संपन्न

मनात विश्वास असेल तर, कुठेलेही कार्य यशस्वी होते.
- मा.ह.भ.प.निंबेकरजी महाराज
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर,तालुक्यातील पळसगाव येथील हनुमान मंदिराच्या पटागणात भागवत सप्ताह समिती व संपूर्ण गावकरी तर्फे आयोजित श्रीमदभागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह तथा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५१ व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव उत्साहात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत भव्य
मिरवणूक काढण्यात आली होती. भागवत सप्ताह समिती व संपूर्ण गावकरी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून हनुमान मंदिर येथे श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे तथा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५१ व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव आयोजन करण्यात येत आहे. बुधवार दिनांक १९ डिसेंम्बर 5 वाजता लाखनी जिल्हा भंडारा येथुन आलेले ह.भ.प.निंबेकर महाराज व त्यांच्या संच व गावातील भक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून विविध, धार्मिक कार्यक्रम पार पडले. दररोज सात दिवस काढण्यात आलेल्या
मिरवणुकीत भागवत ग्रंथ व तुळशीवृंद डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या मंदिर परिसरात प्रदक्षिणा मारून गावातील सर्व धर्माच्या विहार / मंदिरात पूजा करून भक्तीमय गीताने भागवत ग्रंथ व तुळशीवृंद,श्रीपळ घेहुन मिरवणुकी काढण्यात येत होती. या मिरवणुकीत गावातील महिला भाविकांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता.विवीध असे सात दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले.गावांत मोठ्या प्रमाणात आनंद मय वातावरणात भागवत सप्ताह व पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीतेचे आचरण करणे आवश्यक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेल्या विचारावर मार्गक्रम करून जीवन सुधारता येत. का छेढता दुसऱ्या धर्मा, कायात मिडे प्रभू प्रेरणा ,कृष्णा राधा ने मारला खडा आशा सुंदर सुंदर वारकरी भजन सादर करण्यात आली. निंबेकर महाराज यांनी उपस्थित भाविकांना भागवत कथेतून समाज प्रबोधन करताना म्हणाले की, ईश्वराच्या भक्तीत जीवनाचे खरे सुख आहे. मनात विश्वास असेल तरच कुठेही कार्य यशस्वी होते. या सप्ताहात निंबेकर महाराज हे दररोज सकाळी ९ ते ११ सायंकाळी ८ ते १० वाजेपर्यंत भागवत कथा वाचन करून समाज प्रबोधन केले . पूजा, हवन यज्ञ मंगळवारी,बुधवार २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:४५ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रदांजली अर्पण करून व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असून या वेळी. सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव भक्त गावातील महिलाची उपस्थित लक्षणीय होती,व पुरुष यांची सुद्धा प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!