अर्धवट डीपी रस्त्याचे काम पूर्ण करा; अन्यथा आंदोलन.

अर्धवट डीपी रस्त्याचे काम पूर्ण करा; अन्यथा आंदोलन.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इशारा.

 मूल (प्रकाश चलाख)

मुल येथील अतिशय वर्दळीचा रस्ता म्हणून डीपी मार्गाकडे  बघितले जाते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घराचे  बांधकाम करून राहत आहेत. मात्र त्यांना ये-जा करण्याकरिता  पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ सुरू करण्यात यावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष सुमित समर्थ यांनी दिला आहे.

  मुल -चंद्रपूर मार्गावरील दुर्गा मंदिराच्या बाजूला अकरा मीटर रुंद असा  डीपी रस्ता तयार करण्यात आला असून काही भागात सिमेंटीकरण करण्यात आले आहे. उर्वरित भागातील 700 मीटर जवळपास सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही.  या मार्गावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना पावसाच्या दिवसात या रस्त्यावरून  जाणे शक्य नाही. मागील अनेक वर्षापासून सदर  सिमें टी कर नाचे काम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे थंडबस्त्यात आहे. त्याचा फटका वार्डातील नागरिकांना बसत आहे.

 काही दिवसापूर्वी वार्डातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे  निवेदन देता च या मार्गावर चूरी टाकून तात्पुरती रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली .मात्र सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही.

 भविष्यात या रस्त्यावरून पोंभुर्णा तालुक्यात जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग होणार आहे. असे असतानाही या मार्गावर सुरुवातीपासूनच विघ्न येत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभा गाचे अधिकारी रस्त्याचे काम  करण्यास दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सदर रस्त्याचे काम पंधरा दिवसाच्या सुरू करण्यात यावे. अन्यथा मू ल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल इशारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका मूल तर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला.

 सदर निवेदन सुमित समर्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष मुल, दिनेश जी डीबार,  दीपक वेल्पुलवार, इन्‍द्रपाल पुणेकर ,जनार्दन आत्राम, प्रमोद गेडाम यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!