सौ.राजश्री आकांत राज्य स्तरीय गुणिजन गुणगौरव "शिक्षकरत्न" पुरस्काराने सन्मानित
सौ.राजश्री आकांत राज्य स्तरीय गुणिजन गुणगौरव "शिक्षकरत्न" पुरस्काराने सन्मानित
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झरी (मां.) येथे ' सहाय्यक शिक्षिका 'या पदावर कार्यरत सौ.राजश्री आकांत यांना महाराष्ट्र लोकसेवा अकादमी ,मुंबई च्या वतीने राज्य स्तरीय गुणिजन गुणगौरव "शिक्षक रत्न " पुरस्कार ह.भ.प.श्री.शामसुंदर महाराज यांच्या शुभहस्ते देऊन त्याच्या सत्कार करण्यात आला.या प्रसंगी श्रीमती हेमा मकवाना,शिक्षण तज्ज्ञ,सौ.अरुणा परब आयकर अधिकारी,मुबई,.रमेश आव्हाड,सुप्रसिद्ध कवीयांची प्रमुख उपस्थिती होती.राजश्री आकांत ह्या एक उपक्रमशिल शिक्षिका म्हणून चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेली झरी(मां.)येथील जि.प शाळेत शिक्षका म्हणूण कार्यरत असुन विद्यार्थ्यना कला, गुणाना व्हाव मिळावा याकरीता शाळेत विविध उपक्रम राबवित असतात आणि जि.प. शाळा झरी(मां) येतील जि.प.शाळा आय.एस.ओ.शाळा होण्याचा मार्गावर असून, शाळेत अनेक सहशालेय उपक्रम वर्षभर आयोजित केल्या जातात. त्यानी या आधी अनेकदा 'रक्तदान 'करून सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्याना मिळालेल्या पुरस्काराचा सन्मानार्थ बि.ओ.पिसे. मुख्याध्यापक जनार्दन केदार, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष प्रमोद खुरसंगे,तथा सर्व सदस्य गण, पवनकूमार शर्मा, शितल शर्मा यांच्या सह सर्व शिक्षक संघटना व पदाधिकारी आदीने सौराजश्री आकांत चे अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!