दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रमोद राऊत यांना "लोकसूर्य" पुरस्कार घोषीत
दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रमोद राऊत यांना "लोकसूर्य" पुरस्कार घोषीत
भारतातील अनेक नामवंत व्यक्तीची राहणार उपस्थिती
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - खडसंगी येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रमोद राऊत यांना नुकताच "लोकसूर्य" पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्कार कार्यक्रमाला भारतातून अनेक नामवंत व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे. पत्रकार प्रमोद राऊत यांच्या लेखणीची नागपूर येथील जिव्हाळा परिवारांनी दखल घेऊन नुकताच त्यांना लोकसूर्य पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. गौरव कर्तृत्ववान नायकांचा या आशयावर राष्ट्रीय भारत गौरव सन्मान पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रमोद राऊत यांना देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला प्रा. अवंतिका लेकुरवाळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमाला नितीन राऊत मंत्री महाराष्ट्र, अनमोल धाबे वरिष्ठ संशोधन अधिकारी आदिवासी विभाग अमरावती, दिनानाथ भंडारी माजी अध्यक्ष चाईल्ड वेलफेअर हिमाचल प्रदेश, बलरामसिंग भदोरीया राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय कांग्रेस सेवादल दिल्ली, भारत राऊत बोकारो झारखंड, सुरेंद्र बानाईत सरपंच बेलतरोडी, प्रविण आगरे अध्यक्ष कांग्रेस सेवादल नागपूर शहर ईत्यादी मान्यवर देशभरातून येत असून यांच्या हस्ते प्रमोद राऊत यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.प्रमोद राऊत यांच्या दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रातील अनेक बातम्यामूळ शासन प्रशासन यांना घाम फोळला असून, गोरगरीब जनतेला न्याय देणाऱ्या अनेक बातम्या, सामाजिक कार्याच्या बातम्यांचा व उत्कृष्ट लेखन असल्याचे विचाराधीन घेऊन जिव्हाळा परिवार नागपूरचे अध्यक्ष सुप्रिया पाटील, उपाध्यक्ष जानकी बारापात्रे व सचिव मनोज वाळके यांनी प्रमोद राऊत यांच्या वृत्तांची दखल घेत "लोकसूर्य" पुरस्कार घोषित केलेला आहे. येत्या 22 डिसेंबर 2019 ला हा पुरस्कार डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पहिला माळा, उरवेला कॉलनी, छत्रपती चौक, वर्धा रोड, नागपूर येथे सकाळी 11 वाजता सम्पन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजक सचिव मनोज वाळके यांनी पत्राद्वारे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहण्याचे कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!