गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पकडला अवैध दारू साठा

९ लाख ९२ हजार रुपयांचा आहे हा संपूर्ण अवैध दारू साठा
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपुर जिल्हा दारू बंदी झाली असून चिमूर शहरामध्ये होत असलेल्या अवैध दारुविक्रीवर नियंत्रण आनण्याकरिता पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांना
सूचना दिलेल्या असून सदर सूचनांचे अनुषंगाने आज दिनांक.२२/१२/२०१९ रोजी रात्री ०१:३० वाजता च्या सुमारास चिमूर येथील पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना उमा नदी जवळील स्मशानभूमीत दोन अनोळखी इसम एका स्कार्पिओ वाहनामधून दारू उतरवीत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला व एकूण २० बॉक्स मध्ये प्रत्येकी ४८ नग याप्रमाणे एकूण ९६० बॉटल्स किंमत १,९२००० /- तसेच एक स्कार्पिओ गाडी क्रमांक MH 33 A 3499 किंमत ८,०००००/- असा एकूण ९,९२०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी इसम हे घटनास्थळावरून पसार होण्यास यशस्वी झाले असून वाहन चालक व वाहन मालक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून चिमूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सदरची कारवाही पोलीस निरीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक रेजिवाड, पोलीस हवालदार विलास निमगडे, पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे, प्रवीण गोन्नाडे, सैनिक गायकवाड, नेटिनकर, श्रीरामे यांनी यशस्वीरित्या हि कारवाही पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!