चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रात जिपीएस प्रणालीच्या वापरातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाची धडक मोहिम सुरू
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - जिल्ह्यामध्ये चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रात अवैधरित्या रेतीची वाहतुक करुन तस्करी करणाऱ्या वाहनांवर वनविभागाच्या विशेष पथकाने कारवाई मोहीम सुरु केली आहे. वन परिमंडळ अधिकारी आणि वन विकास महामंडळाच्या विशेष पथकाचे प्रतिनिधी रमेश बलैया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून या कारवाईत रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला जप्त करण्यात आले आहे. चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रात अवैधरित्या रेतीची वाहतुक करुन तस्करी होत असल्याची माहिती वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाचे प्रमुख रमेश बलैय्या व त्यांचे पथकातील सहकाऱ्यांनी कारवाई नियोजित करून सोमवार दिनांक.२३/१२/२०१९ रोजी पहाटे चार वाजता वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाने भीसी क्षेत्रात जाऊन रेती वाहतुक करणारया वाहनावर जप्तीची कारवाई करून ट्रॅक्टर मालक प्रकाश सिताराम रेवतकर (रा. भीसी) याला अटक केली. व रेती तस्करी करणारे ट्रॅक्टरवर जिपीएस प्रणालीचा वापर करून ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टर चे लोकेशन ट्रॅक्टर मालकाला देत असतात व ट्रॅक्टर रेती तस्करीला वनक्षेत्रात गेल्यापासून तो परत भिसी गावात येईपर्यंत ट्रॅक्टर मालकाला त्याच्या मोबाईलवर ट्रॅक्टरचे जिपीएस लोकेशन मिळत असता तसेच ट्रॅक्टर मालक वनक्षेत्राच्या जवळपास थांबून ट्रॅक्टर चालकाला वनक्षेत्राच्या बाहेर येण्याकरिता वनाधिकाऱ्यांची हालचालीची माहिती देत असतात अशाप्रकारे जिपीएस प्रणालीचा वापर अवैध रेती तस्करी करणारे करत असल्याचे आज निदर्शनात आले असे पथक प्रमुख रमेश बलैया यांनी सांगितले. वनक्षेत्रात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तस्करावर प्रतिबंध आणण्याकरिता विशेष मोहीम सुरू असून त्यांनी आत्तापर्यंत जवळपास अनेक वेळा कार्यवाही करून अवैध रेती वाहतुक तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली. पथकात क्षेत्र सहाय्यक अशिष बायस्कर, वनरक्षक आर.पी.आगोसे व इतर वनाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कामासाठी पश्चिम चांदा वन प्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी विवेक मोरे व सहाय्यक व्यवस्थापक सुनील आत्राम तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ऋतुराज बारटक्के यांचे या मोहिमेस मार्गदर्शन मिळाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!