पंचायत समिती चिमुर चे कृषी अधिकारी करतात नेहमी पदाचा गैरवापर

दुकानदार व कृषी अधिकारी यांची मिलीभगत असल्याची नागरिक तसेच शेतकऱ्यांची आरडा - ओरड
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर पंचायत समिती मध्ये बिरसा मुंडा व बाबा साहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून अनेक शेतकऱ्यांना विहिरींची योजना शासनामार्फत देन्यात आली. त्यात विहिरीला अनुदान २,५०,०००/- रुपये आहे त्या व्यतिरिक्त ८०,०००/- रुपये मोटार व ( पाणबुडी ) ३ एच.पी
८ स्पिंकलर ७२ पाईप ( PVC ) रंग पांढरा तसेच इलेक्ट्रिक साठी १०,०००/- रुपये अनुदानित योजना आहार असे एकूण अनुदान ३,३०,०००/- हजार रुपयांची आहे.त्यात कृषी अधिकारी सन २०१५ पासून चिमूर पंचायत समिती मध्ये कार्यरत असून तेव्हा पासून त्यांचा नेहमी मनमानी कारभार मोठ्या प्रमाणात सुरू असते. तेव्हा संवर्ग विकास अधिकारी ( BDO ) यांचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. अनेक वर्षांपासून अशा किती तरी योजना त्यांनी त्यांच्या मार्फत हेरा फेरी करून ठेकेदार यांच्यामार्फत खिशे गरम केली आहे. यामुळेच शासकीय योजनेचे तीन तेरा वाजवले आहे. एकाच लाभार्थ्याला दोन विहिरी चा लाभ आपल्या मनमर्जीने दिल्या गेली आहे हे अनेकांना माहीत आहे.अशी प्रत्येक वेळा आरोप जनता व शेतकरी करीत असून याचे उत्तर कृषी अधिकारी देण्यास नकार देत असतात. व त्याचप्रकारे एकाच ठेकेदाराला काम देणे ज्या लाभार्थीना जास्त शेत जमीन आहे त्यांना योजनेचा लाभ देणे बैल - बंडी योजना अशा कितीतरी योजनेच्या विरोधात माहिती च्या अधिकारात माहिती शेतकऱ्यांनी मागितली असता माहिती न देणे अशी अनेक प्रकरणे आहे . व त्यांचा विरोधात अनेक बातम्या दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित केल्या गेल्या असून त्या कृषी अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाही अजूनपर्यंत झालेली नाही. हि एक आचर्याची बाब आहे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंनर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना ८ स्पिन्कलर पाईप ३० काळे पाईप ते नाही पाहिजे असल्यास त्या शेतकऱ्यांना ७२ पांढरे पीव्हीसी पाईप देण्यात येते. परंतु कृषी अधिकारी तसेच जय बजरंग टेडर्स ब्रम्हपुरी येथील दुकानदार कम ठेकेदार यांच्या संगम मताने चिमूर पंचायत समिती मध्ये शेतकऱ्यांना PVC पाईप ३० नग वितरीत करून त्यांचे कडून ७२ नग PVC पाईपचे बिल काढुन ठेकेदार शेतकऱ्याची फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना माहीतच नाही की आम्हाला PVC पाईप मिळतात तरी किती व कृषि अधिकारी सांगेल त्याच्यावर विश्वास करून अडानी साध्या - भोळ्या शेतकऱ्यांची फसवणुक होत असते चिमूर पंचायत समिती मध्ये PVC पाईप वितरीत करणारा दुकानदार ( ठेकेदार ) व कृषी अधिकारी हे एकाच गावचे रहिवासी असून अधिकारी शेतकऱ्यांना सांगतोय की मी पाठविलेल्या दुकानदार यांचे कडूनच सामान घ्या असे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो हे कितपत कृषी अधिकारी यांचे योग्य आहे असा ? निर्माण झाला आहे . अशा अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही ? अशा अधिकाऱ्याची पाठराखण करतोय तरी कोण ? अशी चर्चा शेतकरी बांधव आणि चिमूर तालुक्यातील आजू - बाजूच्या परिसरातील जनता करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!