भंगार व्यवसायामुळे नागरिक त्रस्त तहसीलदार चिमूर यांना दिले निवेदन
भंगार व्यवसायामुळे नागरिक त्रस्त
तहसीलदार चिमूर यांना दिले निवेदन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
नेरी येथील गांधी वार्ड नंबर ४ मधील नागरीकांना भंगार व्यवसायामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे वार्डातील नागरीकांनी लेखी निवेदन तहसीलदार चिमूर यांना दिले आहे.
भंगार व्यवसाय नेरी येथील गांधी वार्ड नंबर ४ मध्ये चालू असुन या व्यवसायामुळे गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे भंगार व्यवसायामुळे अस्वच्छता निर्माण झाली असून डासांची उत्पत्ती झाली आहे व ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तरी प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन नागरीकांच्या आरोग्याशी खेळण्यारा भंगार व्यवसाहिकचा बंदोबस्त करावा अशी मागणी नेरी येथील वार्ड नंबर ४ येथील नागरिकांनी तहसीलदार चिमूर यांना निवेदन देऊन केली आहे.
तहसीलदार चिमूर हे भंगार व्यवसाहिकावर काय कार्यवाही करतात या कडे नेरी वाशीयाचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!