कृषी साहित्याचे अनुदान प्रलंबित.

कृषी  साहित्याचे अनुदान प्रलंबित.

  मुल (प्रकाश चलाख)

 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत मिळत असलेले कृषी साहित्याचे अनुदान  तालुक्यातील लाभार्थी  शेतकऱ्यांना अजून पर्यंत ही न मिळाल्याने लाभार्थी  शेतकरी कृषी विभागात येरझारा घालत असल्याचे विदारक चित्र आहे .

 मूल तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी  कृषी विभागाच्या सदर योजनेअंतर्गत कृषी साहित्य खरेदी केलेले आहेत. कृषी साहित्य खरेदी करन्या अगोदर संबंधित विभागाकडून पूर्वसंमती घेण्यात आलेली आहे. संमतीनंतरच लाभार्थी हा कृषी अवजारांची खरेदी करीत असतो.

 शेतकऱ्यांनी  या अवजार खरेदी त आपला पैसा गुंतविला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सदर योजनेचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना  अजून पर्यंत ही मिळालेले नाही.  त्यामुळे लाभार्थी वर्गात  कृषी विभागाच्या सदर प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 "उन्नत शेती -प्रगत शेती "ही महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यां प्रति बहाल केलेली शेतीपूरक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू शेतकरी लाभार्थ्याला विविध कृषी साहित्य खरेदी करण्याचे धोरण असून या योजनेअंतर्गत  काही प्रमाणात साहित्य खरेदी वर अनुदान  मिळतअसतो. परंतु कुंपणच शेत खात असल्याने  ही योजना  गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ही खेदजनक बाब आहे".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!