मूल तालुक्यातील बेकायदेशीर रेती उत्खननाविरोधात शिवसेनेचे निवेदन
मूल तालुक्यातील बेकायदेशीर रेती उत्खननाविरोधात शिवसेनेचे निवेदन
मूल : तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतुकीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार, मूल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मूल तालुक्यातील विविध नदी पात्रांमध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू आहे. नदीपात्रात यांत्रिक साधनांचा वापर करून मनमानी पद्धतीने उत्खनन केले जात असून मंजूर क्षेत्राच्या बाहेरूनही रेती उपसा केला जात आहे. यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व रेती घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन देताना महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंद्रपूर भारतीताई राखडे, शहर प्रमुख मूल विशाल नागुलवार, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल आपकेवार, महिला विधानसभा प्रमुख शितल वेलपुलवार, महिला तालुकाप्रमुख शालिनी खैरे तसेच युवासेना उपतालुकाप्रमुख आशिष टिकले उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!