डोक्यात दगड घालून एकाची हत्त्या
शेगाव बु.येथील घटना
नागरिकात भीतीचे वातावरण
नालेसफाईच्या ठेकेदाराची हलगर्जीपणा
जबाबदारी घेणार कोण?
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु.येथे सकाळी आठच्या दरम्यान आष्टा बायपास रोडवर नालेसफाई करणाऱ्या दोन कामगारमध्ये शुल्लक कारणावरून वाद सुरू असता वाद सोडविण्यासाठी गेलेल्या इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची घटना घडली. दगडाने ठेचणारा आरोपी महेंद्र रमेश भुरे वय वर्ष 36 राहणार दहेगाव जोशी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर याने शेगाव येथील रहिवासी विश्वनाथ परसराम कांबळी वय वर्ष 65 यांना दगडाने डोक्यावर वार करत हत्या केली त्या नंतर आरोपीने तिथून पळकाढला असता जमावाने पाठलाग करण्यास सुरुवात केली तसेच घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली, शेगाव पोलीस यांनी अवघ्या एका तासाच्या आत आरोपीस अटक करून बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी महेंद्र भुरे हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून शेगाव बु.येथे गावातील सुरू असलेल्या नाले सफाई काम करीत होता विशेष म्हणजे नाले सफाई ठेका हा माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात आलेला असून त्या ठेकेदाराकडे बाहेरून आणलेल्या मजुरांची कुठलीही माहिती नाही संबंधित ठेकेदाराला प्रश्न विचारले असता उडवाउडवी चे उत्तर त्याने दिले त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपी हा अगोदरच गुन्हेगारी वृत्तीचा आहे का ? प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे व ग्रामपंचायत गावांमध्ये कुठलेही कामे करताना तसेच ठेकेदार निवडत असताना अशाप्रकारे हलगर्जीपणा करत असेल तर या पेक्षाही आणखी मोठी घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता गावकरी निर्माण करत आहे ? यावेळी घटनास्थळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असुन या घटनेमुळे गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,शेगाव सहीत परिसरात मागील अनेक दिवसांपासून वारंवार होत असलेल्या गुन्हेगारी घटना आता मोठा चिंतेचा विषय बनला असून पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे? तसेच शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 102 गावे येत असल्यामुळे या मध्ये असलेले पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारीवर अंकुश लावण्यास कमतरता भासत असून जनतेच्या सुरेक्षकरिता पोलीस स्टेशन मध्ये जिल्हा प्रशासनाने कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता आहे.या घटनेच्या पंचनामासाठी फॉरेन्सिक टीम चिमूर, एलसीबी चंद्रपूर हे दाखल झाले असून मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आलेला आहे.या घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे.लावण्यास कमतरता भासत असून जनतेच्या सुरेक्षकरिता पोलीस स्टेशन मध्ये जिल्हा प्रशासनाने कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता आहे.
या घटनेच्या पंचनामासाठी फॉरेन्सिक टीम चिमूर, एलसीबी चंद्रपूर हे दाखल झाले असून मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आलेला आहे.या घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!