अवैध रेती व मुरूम उत्खनन
अवैध रेती व मुरूम उत्खनन
अधिकाऱ्यांचे संगनमत
शासनाच्या लाखो रूपयाचा कर डुबित
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
शंकरपूर व परिसरात अवैध्य मुरूम व रेती तस्करीला ऊत आला असून काही लाचखोर अधिकार्यांच्या संगणमताने परिसरातील नदी, नाले व जंगलालगत असलेले छोटे पाट बंधारे यातून अवैध्य रेतीचा अतोनात उपसा केला गेल्याचे चित्र सद्यः शंकरपूर व परिसरात पहायला मिळत आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयाच्या आर्थिक कराचे नुकसान होतांना दिसून येत आहे.
*शंकरपूर व परिसरात दिवाळीच्या आधीपासून शेकडो नवीन घर बांधकाम, दूकानगाळे बांधकामाची कामे सुरू झाल्याचे चित्र गावात दिसून येत असून यासाठी लागणारी रेती व भरना करण्यासाठी लागणारा मुरूम याची अतोनात चोरी होत असून रात्री दहा तें पहाटे पाच पर्यंत जे. सी. बी. व ट्रक्टर द्वारे ही रेती व मुरूम चोरी जाण्याचा प्रकार अधिकार्यांच्या आशीर्वादाने होत आहे.
शासन निर्णयाप्रमाणे रेती उपसा सूर्यास्ताआधी व सूर्यास्तानंतर करता येत नाही पण या आदेशाला केराची टोपली दाखवीत रेती तस्कर शंकरपूर सह कोलारी, चिचाळा, पांजरेपार, कवडसी (देश), चकलोहारा, चकजाटेपार, डोंगरगाव, डोंगरगाव तलाव, कीटाळी, डोमा, नवतळा, कवडसी (डाग), मांगलगाव यांचे सह जिथे जिथे छोटे-छोटे जंगलातील पाट व बंधाऱ्यात वाहून आलेली रेती मिळेल त्या ठिकाणाहून खुलेआम रेती चोरी होत असल्याचे कोणत्याही अधिका-राला माहित नाही का ? किंवा माहिती असून तें लाच घेऊन चुप्पी साधून बसले आहेत का असाही प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे.
जंगलातील छोट्या-छोट्या पाटातील रेती चोरी करीत असताना रेती तस्कराच्या गाड्या जाण्याकरीता येथील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून येथिल वाईल्ड लाईफ अस्ताव्यस्त होत आहे. एवढेच नाही तर जंगली जनावरांच्या शिकारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!