चंद्रपुर जिल्हातील नागभिड तालुक्यामधील ४ सरपंच व ७१ सदस्यत्व रद्द
पळसगाव - प्रतीनीधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दि.०७/११/२०१९ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १०-१अ अन्वये आणी ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचे शासन निर्णय क्र. ग्रा.पं.नि-२०१४/प्र क्र.२दिनांक ४ अॉगष्ट २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुण चंद्रपुर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार सर यांनी तब्बल ४ सरपंच व ७१ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द जात वैधता प्रमाणत्र सादर न केल्याने रद्द करण्याचे आदेश दि. ०४/११/२०१९ ला पारीत करुन चंद्रपुर जिल्हातील नागभिड तालुक्यातील राजकार जबर प्रशासकीय दणका दिलेला आहे. या ७१ सदस्यांच्या यादितील प्रमुख्याने नागभिड तालुक्यातील सरपंच व सदस्यांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील जात वैधता प्रमाणपत्र विहीत वेळेत सादर न केलेल्या सर्व सदस्यांचे धाबे दणाणले आहेत तर जिल्हातील अनेकांना याचा धसका बसला आहे विधानसभा निवडणुकीच्या लगेच या स्थानिक प्रश्नांवर दणक्याचे राजकीय तनावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसुन येत आहेत पदे रद्द झालेल्या सरपंच्या मध्ये नागभिड तालुक्यातील गिरगाव - प्रशांत गायकवाड, कोसंबी - रज्जुताई गायकवाड, नवेगाव-शर्मीला गायकवाड व गोविंदपुर - उमाजी खोब्रागडे यांचा समावेश आहे व बाकी सदस्यांची यादी तहसीलदार,बीडीओ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद सचिव, ग्राम पंचायत सदस्य यांना कळविण्यात आले असुन सर्व ग्राम पंचायतींना आदेश पोहोचताच ग्रामपंचायत सुचना फलकावर तात्काळ लावण्याचे आदेश सुध्दा सुचित करण्यात आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!