दुचाकी अपघातात दोन युवक जागीच ठार.

पातानील वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटून दोन युवकाचा जागीच मृत्यू.

  अहेरी ( सेवा वाकडॊतपवार )


आलापल्ली -सिरोंचा मार्गावरील पातानील वळणावर दुचाकीच्या गंभीर अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
 या अपघातात मृतक युवकाची नावे शंकर गुरनुलेवय35रा.नागेपल्ली,संजय काटवले 29 रा. श्रमिक नगर आलापल्ली असे आहे.

 बजाज अवेनगर क्र.MH-33 R 3025 या दुचाकीने भरधाव वेगाने आलपल्ली- कडून सिरोंचा मार्गावर जात असताना दुचाकीचा नियंत्रण सुटून दोघेही सागवाणच्या  झाडाला जबर धडक दिली. यात  दोघांनाही जबर मार लागल्याने दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला.

पुढील तपास अहेरी पोलीस स्टेशन चे  पोलीस निरीक्षक प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!