राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने?

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने?

 प्रवाशांना कमालीचा त्रास;  निर्धारित कालावधीत काम  पूर्ण करण्याची जनतेची मागणी.

 मुल (प्रकाश चलाख)

 राज्याच्या मार्ग परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नुकतीच राज्यात 6 राष्ट्रीय महामार्ग घोषित केले असून विदर्भातील चंद्रपूर -गडचिरोली मार्गाची जोडणी राष्ट्रीय महामार्ग ला करण्यात आली आहे. यापैकी नवीन घोषित झालेला राष्ट्रीय क्रमांक 930 चंद्रपुर- मुल- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून याचा फटका थेट  वाहनधारक व प्रवाशांना बसत असल्याने जनता कमालीची त्रस्त झाली आहे.

 केंद्रात  भाजपाची सत्ता येताच मार्ग परिवहन राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग घोषित केले आहे .दळणवळणासाठी अधिक  सोयीचे  होण्यासाठी व सामान्य जनतेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून सदर मार्गांचे नवीनीकरण करून जिल्ह्यातील मार्गांची जोडनी नवीन मार्गाला करण्यात आलेली आहे.

 राज्यातील  वनी- वरोरा- चंद्रपुर- मुल गडचिरोली -धानोरा -छत्तीसगड हा 280 की मी ्चा नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930  करण्यात आला आहे .  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930   चंद्रपूर- मुल- गडचिरोली लांबी 72 किमी असून  सदर महामार्गाचे काम सुरू आहे.

 जिल्ह्यातून दोन  राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्हासाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे .परंतु सदर महामार्गाचे काम हे संथगतीने होत असून मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना या चा  नाहक त्रास सहन करावा लागत  आहे.

 मुल ते  जाना ला तसेच मुल ते सावली  मार्गावर प्रवाशांना वाहनधारकांना प्रवास करणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी रस्ता  समपातळीत नसल्याने  व जागोजागी खड्डे असल्याने जीव धोक्यात ठेवून प्रवाशांना मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.  या मार्गावर गेल्या वर्षभ रात अनेक अपघात घडले असून पादचारी, वाहन धारक, प्रवासी इत्यादींना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.

 मुल- जनाळा ते  मुल- सावली  व पुढे मार्गावरील काम संथ गतीने होत असल्याने मुले येतील अनेक सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी शासनाला याअगोदर निवेदन देऊन निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. परंतु प्रशासन व संबंधित कंत्राटदाराकडून होत असलेले काम  कासव गती मुळे  नागरिक, प्रवासी कमालीचे  त्रस्त झाले आहे त.

 "मुल_ जाना ला ते मुल- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी जागोजागी खड्डे पडले असून प्रवाशांना जाणे-येणे करणे कठीण झाले आहे. या खड्ड्यांमुळे  नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शासनाला आम्ही अनेकदा निवेदन देऊन या कामाबाबत अवगत केलेले आहे. संबंधित कंत्राटदाराने, प्रशासनाने  याकडे लक्ष देऊन काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे. अन्यथा मुल तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
 
            कवडुजी  येनप्रेडीवार.
      अध्यक्ष, आम आदमी पार्टी मुल.

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!