रेफर टू चंद्रपूर मुळे जिल्हा सामान्य रूग्णालय हाऊस फुल्ल!
रेफर टू चंद्रपूर मुळे जिल्हा सामान्य रूग्णालय हाऊस फुल्ल!
च्ंद्रपूर (प्रतिनिधी)
तालुक्यातील ग्रामिण रूग्णालयात करावयाचे उपचारही आता तेथे न करता, सरसरकट ‘रेफर टू चंद्रपूर’ची चिठ्ठी रूग्णांच्या हातात मिळत असल्यांने चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची गर्दी वाढली आहे. उपचारासाठी तर सोडाच, या रूग्णालयात पाय ठेवायलाही जागा नसल्यांचे दिसून आले आहे.
जिल्हयातील वाढते प्रदुषण आणि बदलते विचित्र मोसम यांमुळे विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या महागाईमुळे खाजगी रूग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्यांने, अनेक रूग्ण, स्थानिक प्राथमिक स्वास्थ केंद्रात, उपजिल्हा रूग्णालयात, ग्रामिण रूग्णालयात दाखल होतात. मात्र अपुरे कर्मचारी, अपुरे वैदयकिय अधिकारी, उपचारांच्या साधनांचा अभाव यामुळे ज्या आजारांवर स्थानिक पातळीवर उपचार केले जावू शकते, असे उपचारांसाठीही आता ग्रामिण रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी रूग्णांना ‘रेफर टू चंद्रपूर’ची चिठ्ठी देत आहेत. यामुळे हे सर्व रूग्ण चंद्रपूरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात गर्दी करीत आहे. या रूग्णाशिवाय, चंद्रपूर शहरातील रूग्ण, तेलंगाणातील रूग्णांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे रूग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील ही गर्दी पाहूनच, अनेक रूग्ण प्रसंगी कर्ज काढून नाईलाजाने खाजगी दवाखाण्यांचा मार्ग स्विकारीत असल्यांचे दिसून येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!