आंबेडकरवाद आता जगाला अर्पण करतोय: ॲड. भुपेश पाटील

आंबेडकरवाद  आता जगाला अर्पण करतोय: ॲड. भुपेश पाटील


पळसगाव -  प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - भारतातील चिमूर येथे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य सम्मेलन यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर पहिल्या विश्व साहित्य सम्मेलनाचे उदघाटन दि. ८/११/२०१९ रोजी थाईलंड देशाची राजधानी बैंकाक येथे झाले. मावळत्या सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष चिमुर येथील आंबेडकरी साहित्यिक ॲड. भूपेश पाटील यानीं स्वागताध्यक्षपदाची सुत्रे नवे स्वागताध्यक्ष राज्यसभा सदस्य खासदार अमर साबळे  यांच्याकडे सुपूर्द केली. सम्मेलनाचे उदघाटन भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील माजी मुख्य न्यायमूर्ती के जि बालकृष्णन व मलेशिया देशातील प्रसिद्ध लेखक व पत्रकार डि के पंजामुर्ती यांच्या हस्ते झाले यावेळी मंचावर मराठा सेवा संघाचे पुरूषोत्तम खेडेकर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे महासंचालक भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी कैलास कणसे उपस्थित होते. 

स्वागताध्यक्ष पदाची सुत्रे सोपवतानां व उदघाटन सत्रात बोलतानां ॲड. भुपेश पाटिल म्हनाले कि चिमूर हि भारतात क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाते आज चिमूर हि क्रांतीभूमी आंबेडकरवादाचे सुत्र हे जगाला अर्पण करीत असून केवळ आंबेडकरवाद हि संकल्पनाच वैश्विक मानवतावाद व लोकशाहिला वाचवू शकते. आंबेडकरवाद हि जागतिक संकल्पना असल्याने संपूर्ण जगातल्या वंचित पीडित रंजल्या गांजल्यानी आंबेडकरवादाची सुत्रे स्विकारून आपला उद्धार करावा असे विचार व्यक्त केले. परदेशातील या साहित्य सम्मेलनात भारतातील सर्व राज्यातून तसेच जापान थायलंड मलेशिया सिंगापूर इत्यादी देशातून अनेक प्रतिनिधी उपस्थित आहेत. चिमूर येथूनसुद्धा सदानंद लोखंडे व बोलीभाषा साहित्य संवर्धन महामंडळचे सचिव सुरेश डांगे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!