चिमूर उपविभागिय कार्यालयावर कांग्रेस चा धरणा आंदोलन

चिमूर उपविभागिय कार्यालयावर कांग्रेस चा धरणा आंदोलन


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - अवकाळी पावसाने शेतकरी पोशिंदा मोठ्या अडचणीत सापडलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांच्या रास्त मागण्या घेऊन तालुका कांग्रेस कमिटी चिमूर तर्फे उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांनी आपल्या ‘हाडाची काहिली व रक्ताचे पाणी’ करून शेतात राबतात पण निसर्ग शेतकऱ्यावर कोपला असल्याने ओला दुष्काळाची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाला आहे या करिता चिमूर तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने सतीश वारजूरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहिर करुन तात्काळ सरसकट आर्थिक मदत करावी,धान, सोयाबीन, तूर, कापूस, या पिकांना हेक्टरी ५०,०००/- रू पर्यत आर्थिक मदत देण्यात यावी,शेतकऱ्यांचे सरसकट पिक कर्ज माफ करून सात बारा कोरा करण्यात यावा,
शेतकऱ्याच्या कृषी पंपाची विज बिले बिनशर्त माफ करण्यात यावी,शेतकऱ्यांना पिक विम्याचा तात्काळ लाभ देण्यात यावा आदी मागण्यासह उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलले की, आज दिलेल्या निवेदनातून जर, शासनाने या निवेदनावर प्रतीक्रिया केली नाही तर, येत्या १५ दिवसात शेतकरी यांना न्याय न मिळाल्यास रस्तावर येऊन उग्र रूप धारण करण्यात येईल
  देणार असे रोखठोक विधान यावेळी केले. या धरणा आंदोलन कार्यक्रमला संजय डोंगरे, विजय डावरे, विलास डांगे, शांताराम शेलवटकर, गोपाल झाडे, मनिष नंदेश्वर, संजय बूटके, भावना बावणकर,नाजमा पठान, नर्मदा रामटेके,लता पिसे ,सुधीर राऊत,रहमान पठाण आदि काग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!