भामरागड तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.

*भामरागड तालुका ओला दुष्काळ जाहीर करा*

*शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी*

*तहसिलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

वार्ताहर :सेवा पवार /अहेरी .

भामरागड तालुक्यातील धान पिके चांगल्या अवस्थेत असतांनाच परतीच्या पावसाने शेतातील धान पिकाचे अतिवृष्टीमुळे संपुर्ण धान पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे.

तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामा करून शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि भामरागड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

यावेळी भामरागड चे तहसीलदार कैलास अंडील यांना निवेदन देतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार,शिवसेना तालुका प्रमुख अहेरी अक्षय करपे,शिवसेना तालुका प्रमुख चंदू बेज्जलवार, उपतालुका प्रमुख प्रफुल बिश्वास,महिला आघाडी प्रमुख अंजुताई घरघम,शिवसेना शहर प्रमुख एटापल्ली रविभाऊ मेश्राम,युवासेना शहर प्रमुख एटापल्ली महेंद्र सुल्वावार व लालुजी पुंगाठी हे यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!