रब्बी हंगामासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत खते बी-बियाणे द्या

रब्बी हंगामासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत खते बी-बियाणे द्या
सरपंच वसंता महाल्ले जवराबोडी यांची प्रशासनाकडे मागणी.


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
चिमुर तालुक्यांमध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात अतोनात नुकसान झाले असून आता रब्बी हंगामाच्या हंगामाला सुरुवात होत आहे तरी रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्याकडे रुपये नसल्यामुळे शासनाने त्यांना मोफत बी-बियाणे खते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच वसंता महाल्ले यांनी प्रशासनाकडे केली आहे..
चिमूर तालुक्यातील परिसरातील सर्व गावामध्ये खरीप हंगामात अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिके गेली असून पावसामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला असताना रब्बी हंगाम तोंडावर आला असून रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे खते खरेदी करता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील पेरणी साठी लागणारे खते बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रशासनाला सरपंच वसंता महाल्ले यांच्याकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!