मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने केंद्रप्रमुखांची कार्यशाळा व कार्यक्षेत्र भेट संप्पन
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने केंद्रप्रमुखांची कार्यशाळा व कार्यक्षेत्र भेट संप्पन
मूल (आकाश गेडाम):
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात ैब्।स्म् कार्यक्रमा अंतर्गत पंचायत समिती चंद्रपूर येथील केंद्रप्रमुखांची एक दिवसिय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या मागील मुख्य हेतू असा की मॅजिक बस संस्थेच्या द्वारे 12 ते 16 वयोगटातील विद्याथ्यांसाठी ‘खेळा द्वारे शिक्षण, जीवन कौशल्य विकास’ हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात राबविला जात आहे आणि तो नव्याने चंद्रपूर पंचायत समिती मध्ये येणा—या काही शाळांमध्ये राबविला जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती गटशिक्षणाधिकारी साहेब तसेच केंद्रप्रमुखांना असावी या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये प्रथमतः मॅजिक बस संस्थेच्या जिल्हा कार्यालयात संस्थेच्या कार्यक्रमाची ओळख करून देण्यात आली आणि त्या नंतर मुल तालुक्यातील जि. प. उच्च. प्राथ. शाळा चिखली या कार्यक्षेत्राला भेट देण्यात आली. व सर्व मान्यवरांच्या द्वारे मॅजिक बस संस्थेच्या कार्याची पाहणी करण्यात आली. ज्या मध्ये समाधान भसारकर सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चंद्रपूर, विस्तार अधिकारी, विषयतज्ञ व संपूर्ण केंद्राप्रमुखांचा सहभाग होता.
सदर कार्यशाळा वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर, तालुका समन्वयक मॅजिक बस चंद्रपूर व संपूर्ण शाळा सहायक अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरीत्या पार पडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!