शंकरपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम
शंकरपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
विद्यार्थी शिक्षण कल्याण संघटना, शंकरपूर तह. चिमूर जि. चंद्रपूर च्या विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी उपरोक्त कार्यक्रमाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रामभाऊजी भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून तहसीलदार परीक्षित पाटील, मुख्याधिकारी मंगेश खवले, ए. पी. आय विनोद जांभुळे, विस्तार अधिकारी सुजित अकोटकर चंद्रपूर, उपविभागीय जनसेवक (अनुलोम) संदीप लांजेवार गडचिरोली, डॉ. नवाज शेख, राजन कॉम्पुटर एज्युकेशन चे संचालक युवराज मुरस्कर, प्रा. गणेश धोटे कुही, एन.वाय.के.एस. स्वयंसेवक रामेश्वर सहारे शंकरपूर मार्गदर्शक करणार आहेत. तरी परिसरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थी शिक्षण कल्याण संघटना, शंकरपूर च्या वतीने केले आहे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!