सिनेस्टाईल पाठलाग करून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या पिकपला पकडण्यास चिमुर पोलिसांना मिळाले यश

सिनेस्टाईल पाठलाग करून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या पिकपला पकडण्यास चिमुर पोलिसांना मिळाले यश


२० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - दिनांक १४/११/१९ ला रात्रो ०८:३० वा. सुमारास अवैधरित्या दारु वाहतुक करणाऱ्या पिकअप वाहनाने पिएचसी चौक नेरी येथे दुसऱ्या वाहनाला धडक देऊन पळुन गेला आहे. अशी माहिती चिमूर येथील पोलीस निरिक्षक  स्वप्निल धुळे यांना मिळताच ते आपल्या पोलीस पथकासह तात्काळ रवाना होऊन पळुन गेलेल्या पिकअप वाहनाचा नेरी परिसरामध्ये शोध घेत पिकअप वाहनाच्या चालकाने वाहनातील दारुचा माल पकडल्या जावु नये म्हणुन वाहन गोरवट ते मोटेगांव जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुचे शेतामध्ये लपवून ठेवले व त्या ठिकाणावरून चालक पळून
गेला. पोलीसांनी सदर वाहनाचा शोध घेऊन पाहणी केली असता महिंद्रा बोलेरो वाहन क्र.MH-३०-BD-१३१६ या वाहनामध्ये एकुण १३९ खरड्याच्या खोक्यात प्रत्येकी १०० नग प्रमाणे ९० मि.ली. मापाच्या देशी दारुने भरलेल्या शिशा. किंमत १३९०००० रु. तसेच महिंद्रा बोलेरो वाहन क्र. MH-३०-BD-१३१६ किंमत ४००००० व Swift VDi क्रमांक MH-४०-AR ४७२० किंमत ३००००० रु. असा एकुण २०,९०,००० रु. चा मुद्देमाल मिळुन आला असून सदर घटनेमध्ये आरोपी नामे रोहित कमलाकर पाटील रा. नंदोरी यास अटक करण्यात आली.व इतर आरोपी नामे नितेश नवरखेडे, दर्शन किन्नाके रा. हिंगणघाट, बोलेरो पिकअपचे वाहन चालक हे फरार झाले. असून सदरची कार्यवाही हि पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे, व पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम सह पोलीस हवालदार विलास निमगडे, प्रविण तिराणकर, पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे, सुशिल आठवले, सचिन खामनकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर यांच्या दारुबंदी पथकातील पोलीस उपनिरीक्षक ग्यानेंद्र तिवारी, पोलीस हवालदार रामचंद्र चापले, पोलीस शिपाई धनराज कोडापे, अतुल कानवटे यांनी संयुक्तीकरित्या हि कारवाही पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!