वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या बियर बार संचालीका सौ.वनिता रंगारी ला चिमूर पोलिसांनी केली अटक
वनिता बियरबार मध्ये सुरू असणारा देह व्यापारांचा कुंटणखाना उध्वस्त
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दि.१६/०५/२०२६ रोज शनिवारला चिमूर पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली कि ,आझाद वार्ड चिमूर येथे वनिता बियर बारची संचालीका वनिता रंगारी हिने तीच्या बार चे वर लॉज सदृश खोल्या काढलेल्या असुन त्यात ती बाहेरील महिलांना देह व्यापारा करीता ग्राहकांना पुरवठा करते व वरील खोल्या त्यांना या व्यवसाया करीता उपलब्ध करून देते. तसेच पिडीत महिलांना मिळाणा-या या पैशातुन स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता कमीशन घेवुन पिडीत महिलांचे शोषण सौ.वनीता रंगारी करत असल्याचे सांगण्यात आले होते.सदर महितीची गोपनिय सुत्रधाराकडुन शहनिशा केली असता महिती मध्ये तथ्य आढळुन आल्याने आज रोजी वनिता बार येथे शरीर सुखा साठी महिला मिळविण्याकरीता बनावट ग्राहक पाठविला असता वनिता रंगारी या महिलेने बनावट ग्राहकाला १०००/रूपयामध्ये तीचे बियर बारचे वरील खोलीत व पिडीत महिला उपलब्ध करून दिली. बनावट ग्राहाकांने पोलीसाना सांकेतिक ईशारा देताच, आजुबाजुला दबा धरून बसलेल्या पोलीस पथकांने गावातील दोन प्रतिष्ठीत महिला पंचासह छापा टाकला असता सदर वनिता बियर बारचे वरील माळ्यावर खोली क्र. ३ मध्ये रूम मध्ये बनावटी ग्राहक व पिडीत महिला हे आक्षेपार्ह स्थितीत मिळुन आले. सदर घटनास्थळी देह व्यापारा करिता लागणारे विविध वस्तु/साहित्य मिळुन आल्याने तसेच सदर महिला आरोपीच्या ताब्यातुन देहव्यापाराचे १८,२००रू/- जप्त करण्यात आले. सदर पिडीता हि बाहेर जिल्ह्यातील असुन मागील ६ महिण्यापासुन ती बार मालक वनिता रंगारी हिचे घरी किरायाणे राहत असुन देह व्यापारांचे व्यवसायात गुंतली आहे. सदर वनिता बियर बारची संचालीका वनिता जगन रंगारी हिला ताब्यात घेतले असुन तीचे विरूध्द कलम १४३ (२),बीएनएस सह कलम ३,४,५,६,७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम सन १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यांची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे,पोलीस उपनिरीक्षक दिप्ती मरकाम,सफौ भास्कर आत्राम, पोहवा.सचिन सायंकार, पोअं.सचिन खामनकर,पोअं फाल्गुन परचाके,पोअं.रोहीत तुमसरे,मपोअं आशा वाकडे, मपोशि.सुरक्षा गेडाम यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!