भगवान बिरसा मुंडा यांची 144 वी जयंती उत्साहात साजरी

भगवान बिरसा मुंडा यांची 144 वी जयंती उत्साहात साजरी


राजुरा (प्रतिनिधी):
      महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथे दि 15 नोव्हेंबर शुक्रवार रोजी भगवान बिरसा मुंडा यांची 144 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
     सदर कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष  विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक एस. पी. उईके सर, यांनी भूषविले व विदयार्थ्यांना बिरसा मुंडा यांची क्रांती गाथा आपल्या मार्गदर्शनातुन सांगितली. प्रमुख मार्गदर्शक लोमेश मडावी सर यांनी भूषविले व विद्यार्थाना बिरसा मुंडा यांनी देश स्वातंत्र्यासाठी केलेली क्रांती आपल्या मार्गदर्शनातून  सांगितली. 
     कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक ए. एस. चिडे सर, एस.डी.निखडे सर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन मेश्राम सर, व आभार प्रदर्शन शशिकांत परचाके सर यांनी केले. सदर कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!