ग्रामीण भागात प्रथम संस्थेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

ग्रामीण भागात प्रथम संस्थेचा नावीन्यपूर्ण उपक्रम 


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दिनांक. १५ नोव्हेंबर २०१९ रोज शुक्रवारला सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल)येथील जि. प. उच्च. प्राथ. शाळेमध्ये गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद आणि गावकरी यांनी मुलांना गणित विषय खेळीमेळीच्या माध्यमातून कसा शिकता येईल? यासाठी मुलांना वेगवेगळी मॉडेल तयार करण्यासाठी मदत केली होती. या  कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.त्यानंतर अतिथीचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.
  मा.घनश्याम खोब्रागडे यांनी प्रास्ताविकात खालील विषयावर प्रकाश टाकला.  पाठयपुस्तकाच्या बाहेर जाऊन अभ्यासपूरक उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा मुलांना गणित विषय शिकविता येतो. त्यासाठी फारसा प्रयत्न करण्याची गरज नाही. मुलांना त्यांच्या परिचयाच्या उदाहरणातून, रोज घडणाऱ्या गोष्टीतून सुद्धा गणित विषयाच्या संकल्पना समजावून सांगता येतात. त्याकरिता फक्त शिक्षकांनी सकारात्मक मानसिकता ठेवायला हवी. विद्यार्थी हा शाळेबरोबरच घरी आणि परिसरात सुद्धा शिकू शकतो हा आत्मविश्वास आपण मुलांमध्ये रुजविण्यास यशस्वी झालो तर सगळे शक्य आहे. फक्त त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची तयारी हवी. आपण या पावलांनी चालल्यास नव्या भारताचा सुजाण नागरिक निश्चितच घडवू यात तिळमात्र शंका नाही. प्रास्ताविकानंतर पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले. मान्यवरांनी गणित जत्रेचे कौतुक केले.
तसेच अशा प्रकारे गावात वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम व्हावेत अशी आशा व्यक्त केली.कार्यक्रमाला मा. मनोज सहारे सरपंच, मा. उमाजी मोहुर्ले, मा. अनिल गुरुनुले, मा. सुनील टोणपे(मु.अ.), मा.शेषराव निकोडे,मा. यशवंत गणवीर, मा. बौद्धकुमार शेंडे आणि मा.महेंद्र गेडाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सुजाता मोहुर्ले, स्वाती सडमाके, जान्हवी मोहुर्ले, मोहित सहारे आणि  मैथिली सहारे यांनी अपार  मेहनत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!