ग्रामगीताचार्य बहुमानाने सन्मानित प्रा.राम राऊत यांचा रविवारी सत्कार
ग्रामगीताचार्य बहुमानाने सन्मानित प्रा.राम राऊत यांचा रविवारी सत्कार
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - गुरुदेव सेवा मंडळाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस प्रा.राम राऊत यांना अलिकडेच ग्रामगीताचार्य बहुमान गुरुकुंज आश्रम मोझरी येथे प्राप्त झाला.चिमूर तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.मागील अनेक वर्षांपासून प्रा.राम राऊत गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य करित असून भजन,किर्तन,व्याख्यानांच्या माध्यमातून ते जनजागृतीचे कार्य करित आहेत.त्यांना ग्रामगीताचार्य बहुमान प्राप्त झाल्याबद्दल वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण,बोलीभाषा साहित्य संवर्धन महामंडळ यांनी त्यांचा सत्कार समारंभ रविवार,दि.२४ नोव्हेंबरला चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण पतसंस्था येथे आयोजित केला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक प्रा.अशोक चरडे राहणार आहेत.
याच कार्यक्रमात कवी भानुदास पोपटे यांच्या विरांगणा मुगदाबाईची अभंगवाणी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.हरी मेश्राम हे या पुस्तकावर भाष्य करतील.थायलंड येथे संपन्न झालेल्या पहिल्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात उपस्थित राहून परतलेल्या सामाजिक कार्यकर्ते ॲड.भूपेश पाटील,सुरेश डांगे यांचे अनुभव कथन यादरम्यान होणार आहे.या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!